झेडपी निवडणूक : जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा?

By: | Last Updated: 21 Mar 2017 04:27 PM
झेडपी निवडणूक : जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा?

मुंबई : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होत आहे. अनेक ठिकाणी भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात.

केवळ सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप युती होण्याची चिन्हं आहेत. तर उस्मानाबाद, कोल्हापूर, नाशिक, नांदेड, सांगली आणि बीड या जिल्ह्यात स्थानिक समीकरणं जुळत नसल्याने शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे हे तीनही पक्ष या जिल्ह्यात एकत्र येण्याची शक्यता कमी आहे.

लाईव्ह अपडेट : (हे पेज रिफ्रेश होत राहिल)

 • औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेना-काँग्रेस युती, अध्यक्षपदी शिवसेनेच्या देवयानी पाटील डोनगावकर, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे केशवराव तायडे

 • चंद्रपूर जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता, अध्यक्षपदी देवराव भोंगळे, तर उपाध्यक्षपदी कृष्णा सहाय

 • कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या शौमिका महाडिक, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या सर्जेराव पाटील यांची निवड

 • बीड जिल्हा परिषद : अध्यक्ष- सविता गोल्हार (भाजप – 34 मतं), उपाध्यक्ष- जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम -34 मतं)

 • हिंगोली : शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अनिल पतंगे, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती

 • कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी शौमिका महाडिक - (भाजप) -  37 मतं

 • भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या जालना झेडपीत शिवसेनेचा अध्यक्ष, सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, अध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश टोपे

 • वर्धा जिल्हा परिषदेत भाजपची पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता, अध्यक्षपदी नितीन मडावी (34 मतं), तर उपाध्यक्षपदी कांचन नांदूरकर (34 मतं)

 • अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे-पाटील, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले

 • कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरु

 • रायगड : जिल्हा परिषद अध्यक्षपदी आदिती तटकरेंची निवड, शेकाप-राष्ट्रवादीच्या उमेदवार आदिती तटकरे यांना 38 मते, तर शिवसेनेच्या स्वाती नवगणे यांना 18 मते

 • परभणी : जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व, राष्ट्रवादीच्या उज्वला राठोड यांची अध्यक्षपदी, तर भावना नखाते यांची उपाध्यक्षपदी वर्णी

 • उस्मानाबाद : जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा भाजपच्या मदतीने झेंडा, अध्यक्षपदी नेताजी पाटील, तर उपाध्यक्षपदी अर्चना राणाजगजित सिंह पाटील यांची निवड. भाजपचे चार, शिवसेनेचे दोन सदस्य गैरहजर

 • नांदेड : झेडपी अध्यक्षपदी शांताबाई जवळगावकर (काँग्रेस), तर उपाध्यक्षपदी समाधान जाधव (राष्ट्रवादी)

 • सोलापूर – झेडपी अध्यक्षपदी भाजप-महाआघाडीचे उमेदवार संजय शिंदे, तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांची बिनविरोध निवड. मोहिते पाटलांच्या नेतृत्वास मोठा सुरूंग, जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार, उमेश परिचारक आणि संजय शिंदे जोडगोळीची रणनिती यशस्वी

 • कोल्हापूर : भाजप आणि मित्रपक्षांचे सदस्य सभागृहात दाखल, खास कोल्हापुरी फेटा बांधून सदस्यांचा सभागृहात प्रवेश

 • नाशिक : केवळ डोक्यावर भगवा फेटाच नाही, यापुढे  मनामनात भगवा विचार असेल, शिवसेना-काँग्रेस-माकप युतीच्या विजयानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया

 • सोलापूर : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु, अद्याप मोहिते पाटील घराण्यातील एकही सदस्य उपस्थित नाही

 • बीड : शिवसंग्राम, शिवसेना, काँग्रेस, सुरेश धस आणि भाजपचे सर्व सदस्य राजेंद्र मस्के यांच्या घरी

 • नाशिक : झेडपी अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे, शीतल सांगळेंना 37 तर  राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांना 35 मतं, एक सदस्य तटस्थ

 • नाशिक : उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या नयना गावित, गावित यांना 37 तर भाजपच्या आत्माराम कुंभार्डे यांना 35 मतं, 1 सदस्य तटस्थ

 • लातूर जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता, मिलिंद लातुरे अध्यक्ष, तर रामचंद्र तिरुके यांची उपाध्यक्षपदी निवडणूक

 • जालना : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार, शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी अनिरुद्ध खोतकर, तर राष्ट्रवादीकडून उपाध्यक्षपदासाठी सतिष टोपे यांचं नावभाजपकडून अवधूत खडके यांचा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

 • यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजप यांची युती होण्याची शक्यता, काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी माधुरी आडे, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचे श्याम जयस्वाल यांचं नावशिवसेनाही तिन्ही पक्षांच्या विरोधात मैदानात, शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी कलिंदा पवार, तर उपाध्यक्षपदासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे बंधू विजय राठोड यांचं नाव

 • नांदेड : काँग्रेसच्या शांताबाई जवळगावकर यांची झेडपी अध्यक्षपदी, तर राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांची उपाध्यक्षपदी वर्णी लगाण्याची शक्यता

 • सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजप-महाआघाडीच्या संजय शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता.

 • नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु, शिवसेना-काँग्रेस-माकपची युती, तर राष्ट्रवादी भाजप आणि 1 अपक्ष एकत्र बसले आहेत

 • नाशिक : भगवे फेटे घालून शिवसेना-काँग्रेसचे सदस्य सभागृहात दाखल, माकपचे 3 सदस्यही सोबत, भाजप, राष्ट्रवादीची प्रतीक्षा

 • बीड : जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी पालकमंत्री पंकजा मुंडे, आ. विनायक मेटे, बदामराव पंडित हेलिकॉप्टरने बीडमध्ये दाखल

 • बीड : राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांचे सदस्य हेलिकॉप्टरने बीडला पोहोचले

 • नाशिक : शिवसेना-काँग्रेस-माकप युतीवर शिक्कामोर्तब, शिवसेनेचा अध्यक्ष, काँग्रेसचा उपाध्यक्ष होणार, शिवसेनेच्या शीतल सांगळे अध्यक्ष होण्याची शक्यता, तर उपाध्यक्षपदी काँग्रेस आमदार निर्मला गावित यांची मुलगी नयना गावित यांच्या निवडीची शक्यता

 • अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शालिनीताई विखे पाटील यांचा अर्ज, तर उपाध्यक्षपदासाठी राजश्री घुले यांचा अर्ज दाखल

 • सांगली : भाजपकडून अध्यक्षपदासाठी संग्राम सिंह देशमुख, तर उपाध्यक्षपदासाठी शिवेसेनेचे सुहास बाबर यांचा अर्जकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सत्यजित देशमुख, तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील मैदानात

 • कोल्हापूर : भाजपकडून शौमिका महाडिक यांचा अर्ज दाखल, पुरेसं संख्याबळ असल्याने शौमिका महाडिक यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यताकाँग्रेसच्यावतीने अध्यक्षपदासाठी बंडा माने, तर उपाध्यक्षपदासाठी जयवंत शिंपी यांचं नाव निश्चित

 • अहमदनगर झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजाला सुरुवात
  जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत कामकाज सुरु11 ते 1 या वेळेत नामनिर्देशन अर्ज सादर होणार3 वाजता छाननी सुरु होणारत्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ राखीवअर्ज माघारी घेतल्यानंतर हात वर करुन मतदान प्रक्रिया सुरु होणार

 • रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून स्वाती नवगणे, तर उपाध्यक्ष पदासाठी सुरेंद्र म्हात्रे यांचा अर्ज

 • रायगड : शेकाप राष्ट्रवादी आणि काँग्रेस युतीकडून आदिती तटकरे यांचा अध्यक्षपदासाठी, तर उपाध्यक्ष पदासाठी आस्वाद पाटील यांचा अर्ज

 • सोलापूर : राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी अनिल मोटे या नवख्या सदस्याची उमेदवारी, तर उपाध्यक्ष पदासाठी श्रीमंत थोरात यांना उमेदवारी

 • औरंगाबाद : शिवसेनेच्या देवयानी कृष्णा पाटील यांचा जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज, तर काँग्रेसचे केशवराव तायडे उपाध्यक्षपदाचे उमेदवार, शिवसेना-काँग्रेसची युती

 • नाशिक जिल्हा परिषद कामकाज -सकाळी 11 ते दुपारी 1 नामनिर्देशन पत्र दाखल होणारदुपारी 1 ते 1.15 अर्ज छाननीदुपारी 1.15 ते 1.30 माघारी मुदत, दुपारी 1.30 नंतर निवडणूक प्रक्रिया सुरु

 • सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप-महाआघाडीकडून संजय शिंदे यांचा अध्यक्षपदासाठी अर्ज, महाआघाडीचं पारडं जड

 • अहमदनगर : झेडपी अध्यक्षपदासाठी राधाकृष्ण विखे पाटलांची पत्नी प्रबळ दावेदार, अनुराधा नागवडे यांचीही प्रयत्नांची पराकाष्ठा, राधाकृष्ण विखे पाटील, दिलीप वळसे पाटील जिल्ह्यात ठाण मांडून, पालकमंत्री राम शिंदे यांचीही सत्तेसाठी व्यूहरचना

 • नाशिक : सीपीएम शिवसेना-काँग्रेस सोबत जाण्याची शक्यता, सीपीएम युतीची बोलणी अंतिम टप्प्यात, अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांचे नाव आघाडीवर, एक अपक्ष राष्ट्रवादीच्या गोटात आल्याची माहिती, थोड्याच वेळात जिल्हा परिषद सत्ताकारण स्पष्ट होणार


संबंधित बातमी :

 जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल!

महाराष्ट्र शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV