जॉली एलएलबी 2

जॉली एलएलबी 2

चैतन्य ताम्हाणेचा कोर्ट हा आजही मनात तितकाच ताजा आहे. अत्यंत संयमी पद्धतीने मांडलेला कोर्टरूम ड्रामाचे ठसे आजही मनावर आहेत, सुभाष कपूरने आपल्यासमोर सादर केलेला जॉली एलएलबी अर्शद वारसीनेही त्याच्या अंदाजात लढलेला कोर्टरूम ड्रामा महत्त्वाचा वाटतो. त्यामधला बोमन इराणी अन् सौरभ शुक्ला ही आपल्या मनात राहतो. ती लढाई त्यामधला नाट्यमय अंदाज अन् त्यासोबतचा तुल्यबळ ठरलेली लढाई महत्त्वाची वाटते.

पण आता यावेळी जॉली एलएलबी २मध्ये अक्षय कुमार आल्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज ग्लॅमरस होणार, हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही.

या सगळ्यात असणारा उपरोधिक सूर आहे. भारतीय न्यायव्यवस्थेवर टाकलेला एक्स रे म्हणून या सिनेमाकडे पाहता येईल. आता जगदीश्वर मिश्रा झालाय अक्षयकुमार…म्हणजे जॉली.

गेल्या कित्येक दिवसांपासून त्याची अडथळ्याची शर्यत काही केल्या संपत नाहीए. परिस्थिती काही केल्या बदलत नाहीय. त्याची गृहकृत्यदक्ष असणारी पत्नी त्याच्यासोबत लढतेय. त्याला धीर देतेय. पण आता जॉलीला एक संधी मिळालीय. आता त्याने मर्डर केसचा गुंता सोडवण्याचा ठरवलंय… मग ओघाने पोलिस कव्हरअप वगैरे सारं काही आलंय. आता झटपट पैसे कमावण्यासाठी विद्यार्थ्यांना इंग्लिशच्या पेपरमध्ये पास करण्यासाठी काय काय शक्कल लढवता येईल… याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन करणारा हा गडी आहे. थोडक्यात जुगाडू आहे.
आता अशा जुगाड करण्याच्या प्रयत्नातून एक गोष्ट अंगलट आली आहे. आता कोणताही वकील त्याला हात लावण्यासाठी तयार नाही अन् आता त्याला ही केस हाती घेण्याशिवाय पर्याय नाही. आता त्याच्यासमोर उभा ठाकलाय. भोवतालच्या वकीलांमध्ये नाव कमावलेला अन् यशस्वी असलेला वकील म्हणजे प्रमोद माथूर त्याच्यासमोर दंड थोपटतो. हा म्हणजे अन्नू कपूर.

या सगळ्या समीकरणात महत्त्वाचं वाटतं ते या सिनेमातील कास्टिंग. कारण टॉम अँड जेरी फाइट करताना त्या सगळ्या प्रकरणाला न्यायप्रक्रियेवर भाष्य करणारं बनवणं अन् त्या सगळ्याला मूल्य अन् तत्त्वांच्या चौकटीत बसवणं असं प्रकरण आहे. कारण वरपांगी पाहता जितकं सोप्पं तितकंच अवघड समीकरण आहे.

पण अक्षयकुमार स्ट्रगलर असणं… त्याने परिस्थितीशी झुंजत जायंट किलर बनणं…या सगळयात हिरोइझम आहे. यामध्ये अन्नू कपूरसारखा बलाढ्य वकील अन् त्या सगळ्यमधला आणखी एक कोन आहे अन् तो म्हणजे सौरभ शुक्ला.

या लढाईमधला नाट्यमय प्रसंग त्यामधला इमोशनल झोन हा खरंच त्या कोर्टरूम ड्रामाला एक वेगळा रंग चढवतो. या सगळ्यात एकच गोष्ट खटकते. सिनेमा काहीसा गती हरवून बसतो. काही ठिकाणी ताणल्यासारखा वाटतो. ही गोष्ट अधिक क्रिस्पी क्रंची करता आली असती असं राहून राहून वाटतं.

एकूणच न्यायव्यवस्थेवर ज्या प्रकारे भाष्य केलं आहे. ते महत्त्वाचं वाटतं काही ठिकाणी आपण ती परिस्थिती पाहिली अनुभवली असण्याची शक्यता असते. त्यामुळे ते आपण रिलेटही करू शकतो.

विनोदी व्हावं म्हणून खूप ठिकाणी विनोद पेरलेले नाहीत ना त्या सगळ्या गोष्टीचा ओव्हरडोस झालाय, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण गोष्ट ओव्हरमेलोड्रॅमॅटिक झाली असती तर आणखी रटाळ झालं असतं. त्यामुळे त्या गोष्टीचं तारतम्य बाळगलं गेलंय. याची जाणीव पाहताना होते. काहीशी वस्तुनिष्ठ करण्याचा प्रयत्न मेनस्ट्रीममध्ये होतो हा महत्त्वाचा भाग आहे.

क्लायमॅक्सला काही ठिकाणी ट्विस्ट अँड टर्न येतात… त्याची गरज नसती तरी चाललं असतं. अक्षय कुमारने आपलं नाणं खणखणीतपणे वाजवलं आहे. त्याचा अंदाज ए बयाँ मस्त आहे. त्याने फुल ऑन बॅटिंग केली आहे. त्याचे युक्तीवाद चांगलीच रंगत आणतात.

सौरभ शुक्ला ज्या पद्धतीने वागतो, बोलतो… त्याचा असणारा अंदाज भन्नाट आहे. त्याच्या वागण्यातील बदल ज्या पद्धतीने दाखवलाय. त्याचा नरम गरम असण्याची टॅक्ट  आवडून जाते. इतकंच काय तर इतक्या दिवसाने आपल्यासमोर आलेला अन्नू कपूर त्याची चांगलीच छाप पाडतो. कारण ही व्यक्तिरेखा तितकीच महत्त्वाची आहे कारण त्याच्या लढवय्या बाण्यावर संपूर्णतः अक्षय कुमारची लढाई अवलंबून आहे. हुमा कुरेशीची व्यक्तिरेखेचा आलेख तितका प्रभावी वाटत नाही.

का पाहावा - जॉलीचा अंदाज, कोर्टरूम ड्रामा पाहण्याच्या मूडमध्ये असाल तर

का टाळावा - काही ठिकाणी खूपच पसरट झालाय

थोडक्यात काय - ही केस स्टडी वेगळी आहे.

म्हणून या सिनेमाला मी देतोय तीन स्टार्स.

शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV