...तर 'या' चित्रपटात तिन्ही खान्ससह राणी, प्रिती, काजोल असत्या!

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 20 April 2017 11:54 PM
...तर 'या' चित्रपटात तिन्ही खान्ससह राणी, प्रिती, काजोल असत्या!

मुंबई : किंग ऑफ रोमान्स शाहरुख, दबंग स्टार सलमान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर या तिन्ही खान मंडळींना एकत्र एका सिनेमात पाहण्याची संधी चाहत्यांना कधीच मिळाली नाही. मात्र अशी शक्यता 15 वर्षांपूर्वी निर्माण झाली होती, हे आता समोर आलं आहे. सलमान, आमीर, शाहरुख सोबत राणी मुखर्जी, काजोल आणि प्रिती झिंटा असा मल्टिस्टारर सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता.

अनुपम खेर दिग्दर्शित ‘ओम जय जगदिश’ मध्ये हे तीन खान एकत्र झळकू शकले असते. तिन्ही खानना एकत्रित भूमिकेसाठी विचारणा झालेला हा आजतागायतचा एकमेव चित्रपट ठरला आहे. आजही तिन्ही खानांची असलेली क्रेझ पाहता, त्याकाळी टॉपला असलेल्या तिन्ही हिरोईन्स आणि तिन्ही खान यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरला असता.

आशुतोष गोवारीकरचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या 1993 मधील ‘पहला नशा’ चित्रपटात दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत होता, तर शाहरुख आणि आमीरने यात कॅमिओ केला. 1994 मध्ये राजकुमार संतोषींच्या प्रचंड गाजलेल्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात आमीर-सलमान एकत्र दिसले होते.

1995 मध्ये राकेश रोशनचा ब्लॉकबस्टर ‘करण अर्जुन’मध्ये शाहरुख-सलमान एकत्र दिसले. त्यानंतर ‘कुछ कुछ होता है’, ‘हम तुम्हारे है सनम’मध्येही ही जोडी दिसली. मात्र तिन्ही खान एकाच स्क्रीनवर आले नाहीत.

2002 मध्ये अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘ओम जय जगदिश’ हा चित्रपट आमीर, शाहरुख आणि सलमानला ऑफर केला होता. बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.

तिघांनी ऑफर स्वीकारली असती, तर अनिल कपूरने साकारलेल्या मोठ्या भावाच्या म्हणजे ओमच्या भूमिकेत आमीर, फरदीन खानची भूमिका असलेल्या मधल्या भावाच्या भूमिकेत शाहरुख तर अभिषेक बच्चनने साकारलेल्या जगदीश या धाकट्या भावाच्या भूमिकेत सलमान दिसला असता.

आमीरसोबत काजोल (आयेशा), शाहरुखसोबत राणी मुखर्जी (नीतू), तर सलमानसोबत प्रिती झिंटा (पूजा) झळकल्या असत्या. दुर्दैवाने या सहाही कलाकारांनी तारखा उपलब्ध नसल्याने ही भूमिका नाकारली. त्यामुळे महिमा चौधरी, उर्मिला मातोंडकर, तारा शर्मा यांच्या पारड्यात अनुक्रमे या भूमिका पडल्या.

यशराज फिल्म्सनी हे कलाकार काम करणार असतील, तरच पैसे गुंतवण्याची अट घातली होती. त्यामुळे अखेर वाशू भगनानींनी हा सिनेमा प्रोड्युस केला. तिन्ही खानना एकत्रित भूमिकेसाठी विचारणा झालेला हा आजतागायतचा एकमेव चित्रपट ठरला आहे.

First Published: Thursday, 20 April 2017 11:54 PM

Related Stories

झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी
झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच ‘चक दे’ गर्ल सागरिका घाटगेशी

'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?
'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?

मुंबई: दोन वर्षापासून चर्चेत असलेला बाहुबली सिनेमा पुन्हा एकदा

...तर माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार
...तर माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार

मुंबई : “मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळालाय, जर तुम्हाला वाटत असेल तर

रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच पार्टनर!
रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच...

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार!
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार!

मुंबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि बॉलिवूडचे सुपरमॅन

सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?
सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आणि कृती सेननच्या ‘राबता’ सिनेमाचा

सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले
सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले

मुंबई : ग्लॅमरस अंदाज आणि बिंधास्त स्वभावामुळे प्रसिद्ध असणारी

अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!
अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!

मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने

अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली
अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनेक वेळा त्यांच्या ट्वीट्समुळे