आमीर खानचं अमरावतीमध्ये श्रमदान

आमीर खानचं अमरावतीमध्ये श्रमदान

अमरावती : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील गावांना प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमीर खान आज अमरावतीमध्ये पोहोचला आहे. वाठोडा गावात आमीर खानने भल्या पहाटे श्रमदानाला सुरुवात केली आहे.

 

आमीरसोबत अभिनेत्री रिमा लागू, सई ताम्हणकर, सुनील बर्वे हेदेखील श्रमदान करत आहेत. कलाकारांनी श्रमदानाला सुरुवात केल्याने गावकऱ्यांमध्येही हुरुप चढला आणि त्यांनी कामाला सुरुवात केली.

 

आमीर गावात येणार असल्याने पहाटे तीन वाजल्यापासून त्याच्या स्वागताची तयारी केली होती. आमीर खान सहा वाजता वाठोड्यात पोहोचला आणि थेट कामाला सुरुवात केली.

 

एकूण 116 गावं वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यापैकी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 50 लाख तर त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अनुक्रम 30 आणि 20 लाख बक्षीस दिलं जाणार आहे. एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळ घालवण्याची ही पहिलीच अनोखी स्पर्धा आहे.

 

पाहा व्हिडीओ

 

MARATHI BIG BOSS शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV