नाना पाटेकरच्या 'आपला मानूस'चा पहिला टीझर लाँच

'आपला मानूस'च्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडेच्या खांद्यावर आहे. नाना पाटेकरसोबत सुमीत राघवन, इरावती हर्षे या चित्रपटात झळकणार आहेत.

नाना पाटेकरच्या 'आपला मानूस'चा पहिला टीझर लाँच

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट 'आपला मानूस'चा टीझर रीलिज झाला आहे. हरहुन्नरी अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

नाना पाटेकर क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती नागरगोजे ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. 'आपल्याला जमेल तेवढाच चांगुलपणा दाखवावा, आपण काय गांधी नाही' यासारखी टाळ्या मिळवणारी वाक्यं टीझरमध्ये आहेत.अजय देवगनने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर 'आपला मानूस'चा पहिला लूक शेअर केला होता. पोस्टरमध्ये एका पावसाळी रात्री नाना पाटेकर बाईक चालवताना दिसत आहेत. 'हा सैतान बाटलीत मावनार नाय' अशी टॅगलाईन पोस्टरवर दिसत आहे. येत्या 9 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नाना हिरो, सतीश राजवाडे दिग्दर्शक, अजय देवगनचा पहिला मराठी सिनेमा


'आपला मानूस'च्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडेच्या खांद्यावर आहे. नानासोबत सुमीत राघवन, इरावती हर्षे या चित्रपटात झळकणार आहेत.

आपल्या वडिलांसोबत राहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ही कथा आहे. शहरी जीवन आणि नात्यांची गुंतागुंत यामध्ये अडकलेल्या पित्याची ही कहाणी आहे. एका अनपेक्षित घटनेमुळे त्यांना आयुष्य आणि कुटुंबाविषयीच्या धारणांवर प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येते.

पाहा टीझर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aapla Manus: Teaser of Ajay Devgn’s first Marathi Movie starring Nana Patekar released latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV