साराला अनुष्काच्या सिनेमाची ऑफर नाकारावी लागली!

केदारनाथ पुढच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे, तर सिनेमाचं शूटिंग जूनमध्ये संपणार आहे

By: | Last Updated: > Tuesday, 14 November 2017 11:10 AM
Abhishek Kapoor asked Sara Ali Khan to reject Anushka Sharma’s next movie latest update

मुंबई : अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. पहिला सिनेमा रीलिज होण्यास वर्षभराचा कालावधी असला, तरी सारा इतर सिनेमे साईन करण्यास उत्सुक आहे. परंतु दिग्दर्शक अभिषेक कपूरने तिच्या मनसुब्यांवर पाणी ओतलं आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माची निर्मिती असलेल्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी साराला विचारणा झाली. सारासोबत तिची आई अमृता सिंगही या ऑफरमुळे आनंदात होती. दोघींनाही अनुष्काचा प्रोजेक्ट साईन करण्याची इच्छा होती, मात्र अभिषेकने त्यात मोडता घातला.

साराच्या पदार्पणाबाबत फक्त चाहतेच नाही, तर इंडस्ट्रीतही उत्सुकता आहे. कायपोछे फेम दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या केदारनाथमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत सारा झळकणार आहे.

केदारनाथ पुढच्या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं शूटिंग जरी जूनमध्ये संपणार असलं, तरी दुसरा सिनेमा स्वीकारल्यास साराचं लक्ष विचलित होईल, असा अभिषेकचा कयास आहे. त्यामुळेच साराने अनुष्काच्या सिनेमाला नम्रपणे नकार दिला.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Abhishek Kapoor asked Sara Ali Khan to reject Anushka Sharma’s next movie latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा निषेधही नाही!
'इफ्फी'त मराठी निर्माते, दिग्दर्शक चिडीचूप, 'न्यूड' वगळल्याचा...

मुंबई: गोव्यातील 48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून

'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह
'पद्मावती'चा विरोध हिंसक, किल्ल्यावर तरुणाचा लटकलेला मृतदेह

जयपूर : ‘पद्मावती’च्या विरोधाने आता हिंसक रुप घेतलं आहे.

...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!
...तर 'ये रे ये रे पैसा', 'टायगर जिंदा है' रिलीज होणार नाही!

मुंबई : अखेर 68 दिवसांचं कारण देत सीबीएफसी अर्थात सेन्सॉर बोर्ड फॉर

चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं
चाहत्यासोबतच्या सेल्फीवरुन पोलिसांनी वरुण धवनला झापलं

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एका अॅडव्हेंचरपर फोटोमुळे अडचणीत

फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर
फिल्म इंडस्ट्री आपमतलबी : मधुर भंडारकर

पणजी : ‘पद्मावती’ सिनेमाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेल्या वादात

संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा
संजय लीला भन्साळींवर नानांचा निशाणा

पणजी (गोवा) : संजय भन्साळी कशा प्रकारचे दिग्दर्शक आहेत, हे सगळ्यांना

'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा
'मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी'च्या सेटवर कंगनाला गंभीर इजा

जयपूर : ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’च्या सेटवर अभिनेत्री कंगना

‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया
‘पद्मावती’ सिनेमाबद्दल रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

मुंबई : ‘पद्मावती ही सती गेली होती. राजपूत समाजामध्ये तिचं देवीचं

मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी
मध्य प्रदेशनंतर गुजरातमध्येही 'पद्मावती'च्या प्रदर्शनावर बंदी

अहमदाबाद : मध्य प्रदेशनंतर आता गुजरातमध्येही संजय लीला भन्साळी

'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य
'मी कोणालाही पद्मावती सिनेमा पाहू देणार नाही', भाजप नेत्याचं वक्तव्य

चंदीगड : ‘पद्मावती’ सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु