फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा

By: | Last Updated: > Thursday, 13 April 2017 8:27 AM
Actor Abhay Deol slams fairness cream ads in facebook post

मुंबई : निवडक चित्रपटांतून वेगळ्या भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता अभय देओल याने चक्क आघाडीच्या कलाकारांवर निशाणा साधला आहे. फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीवर बोट ठेवत शाहरुख खान पासून दीपिका पदुकोणपर्यंत अनेकांवर सोशल मीडियावरुन टीकास्त्र सोडलं आहे.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, जॉन अब्राहम, एलियाना डिक्रुझ, सोनम कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, नंदिता दास यासारख्या डझनभर कलाकारांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींचे फोटो अभय देओलने फेसबुकवर पोस्ट केले आहेत. प्रत्येक पोस्टमध्ये एखादी टिपण्णी लिहून अभय देओलने वर्णभेदाचा विरोध केला आहे.

गोऱ्या रंगाचं अवडंबर, फेअरनेस क्रीमची जाहिरात नाही करणार, अनुष्काचा कौतुकास्पद निर्णय

फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीआड काळा-गोरा असा वर्णभेद निर्माण केला जातो. ब्रँड अॅम्बेसेडर असणारे कलाकार जाहिरातीतून त्वचा उजळ करण्याचा पोकळ दावा करतात. यामुळे केवळ वर्णभेदाला खतपाणी मिळतं. म्हणून चित्रपट कलाकारांनी त्यात पडू नये, असा सल्ला त्याने दिला आहे.

विशेष म्हणजे वर्णभेदाचा मुद्दा उचलून फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या कलाकारांचं अभयने कौतुकही केलं आहे. माझ्या चित्रपटसृष्टीतले सगळेच कलाकार बेजबाबदार नाहीत, असं सांगत त्याने ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वृत्तपत्रातील एका रिपोर्टची लिंकही शेअर केली आहे.

म्हणून कंगनाने दोन वर्षांपूर्वी नाकारली होती 2 कोटींची जाहिरात!

वर्णभेदाचा ठाम विरोध करणारी अभिनेत्री नंदिता दास, बंडखोर अभिनेत्री कंगना रनौत, हरहुन्नरी अभिनेता रणदीप हुडा, चॉकलेट हिरो रणबीर कपूर, अभिनेत्री स्वरा भास्कर यांचं अभयने कौतुक केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर अभय देओलच्या या पोस्टची चर्चा रंगली आहे. वर्णभेदाविरोधात आवाज उठवल्याप्रकरणी अभयचं अनेक यूझर्सनी कौतुक केलं आहे.

अभय देओलच्या फेसबुक पोस्ट्स :

Abhay Deol Fairness Ad 2 Abhay Deol Fairness Ad 3 Abhay Deol Fairness Ad Deepika Padukone Abhay Deol Fairness Ad John Abrahm Abhay Deol Fairness Ad Nandita Das Abhay Deol Fairness Ad Shahid Kapoor Abhay Deol Fairness Ad Shahrukh Khan Abhay Deol Fairness Ad Siddharth Malhotra Abhay Deol Fairness Ad Sonam Kapoor Abhay Deol Fairness Ad Vidya Balan

First Published:

Related Stories

मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!
मालेगावात सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्येच फटाके फोडले!

मालेगाव : अभिनेता सलमान खानच्या ‘ट्युबलाईट’ सिनेमाचा शो सुरु

‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू
‘वळू’ सिनेमातील ‘डुरक्या’चा मृत्यू

सांगली : संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेल्या ‘वळू’

शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज
शिवगामीसाठी केलेल्या मागण्या उघड, श्रीदेवी राजमौलींवर नाराज

मुंबई : बहुचर्चित बाहुबली चित्रपटात भूमिका करण्यासाठी हृतिक रोशन

जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?
जन्मदिन विशेष : आर डी बर्मन यांना 'पंचम' हे नाव कसं मिळालं?

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन

'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई
'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई

मुंबई : अभिनेता आमिर खानच्या ‘दंगल’चा जगभरात धुमाकूळ सुरु आहे.

VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर
VIDEO : काजोल-धनुषची जुगलबंदी, 'व्हीआयपी 2' चा ट्रेलर

मुंबई : काजोल आणि धनुष यांची भूमिका असलेल्या ‘वेलै इल्ला

मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक
मॉडेल कृतिका चौधरीच्या घटस्फोटित पतीला अटक

मुंबई : दोनच आठवड्यांपूर्वी हत्या झालेली नवोदित मॉडेल कृतिका चौधरी

बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...
बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटेना, तीन दिवसांची कमाई अवघी...

मुंबई : सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’ सिनेमा बॉक्स ऑफिसवरची कमाई