अभिनेता प्रतीक बब्बरचा गर्लफ्रेण्ड सान्या सागरसोबत साखरपुडा

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर प्रतीकचा साखरपुडा झाला असून त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही खुशखबर दिली आहे.

अभिनेता प्रतीक बब्बरचा गर्लफ्रेण्ड सान्या सागरसोबत साखरपुडा

लखनौ : बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरचा साखरपुडा झाला. 31 वर्षांच्या प्रतीकने लखनौमधील एका खासगी सोहळ्यात गर्लफ्रेण्ड सान्या सागरच्या बोटात अंगठी घातली.

प्रतीक हा प्रख्यात अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. 22 जानेवारीला लखनौमध्ये प्रतीक आणि त्याची गर्लफ्रेण्ड यांची एंगेजमेंट करणार असल्याची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून होती, त्यावर शिक्कामोर्तब झालं.

प्रतीक आणि सान्या गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना ओळखतात, मात्र गेल्याच वर्षी ते रिलेशनशीपमध्ये अडकले. गोव्यातील एका म्युझिक फेस्टीव्हलदरम्यान प्रतीकने सान्याला प्रपोझ केलं होतं.

अभिनेता प्रतीक बब्बरचा लखनौच्या तरुणीशी साखरपुडा?


दोघांचे कुटुंबीय, मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत वसंतपंचमीच्या मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. प्रतीकने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही खुशखबर दिली आहे. सान्या ही बेस्ट पार्टनर असल्याच्या भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. मात्र दिल्ली, मुंबई आणि लखनौमध्ये वेगवेगळी रिसेप्शन्स ठेवण्याचा प्रतीकचा प्लॅन आहे. बीच वेडिंग किंवा मंदिरात साधं लग्न करण्याची प्रतीकची इच्छा आहे.#monday.. "holy snappp!.. that just happened!" 💗


A post shared by Prateik Babbar (@_prat) on


प्रतीक बब्बरने 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तो एक दिवाना था, धोबीघाट यासारख्या चित्रपटांमध्ये झळकला. 'बागी 2' चित्रपटातून तीन वर्षांनी तो पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अहमद खान यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात तो खलनायकाच्या व्यक्तिरेखेत आहे.

सान्याचा जन्म 1 मे 1990 रोजी लखनौमध्ये झाल्याची माहिती आहे. फॅशन कम्युनिकेशन या विषयात तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतून पदवी घेतली. सध्या ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करते. लग्नानंतर एकत्र काम करायला आवडेल, असंही प्रतीक म्हणतो.

प्रतीकचे वडील अर्थात प्रख्यात अभिनेते राज बब्बर राजकारणात आहेत. त्याचप्रमाणे सान्याचे वडील पवन सागरही राजकारणात सक्रिय आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actor Prateik Babbar gets engaged to girlfriend Sanya Sagar in Lucknow latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV