अभिनेता राजपाल यादवची मुलगी ज्योती विवाहबंधनात

ज्योतीचा नवरा गेल्या दोन वर्षांपासून बँकेत कॅशियर म्हणून कार्यरत आहे.

अभिनेता राजपाल यादवची मुलगी ज्योती विवाहबंधनात

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची मुलगी ज्योती यादव विवाहबंधनात अडकली आहे. ज्योती ही राजपाल यांची पहिली पत्नी करुणा यांची कन्या आहे. राजपाल यादव यांचा जावई बँकेत नोकरी करतो.

ज्योतीच्या जन्मानंतर बाळंतपणातच करुणा यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 15 व्या वर्षापर्यंत ज्योतीचं शिक्षण त्यांच्या मूळगावी म्हणजे कुंद्रामध्ये झालं. गेल्या पाच वर्षांपासून ती वडिलांसोबत मुंबईत राहते.

रविवारी, 19 नोव्हेंबरला कुंद्रातच ज्योतीचं लग्न झालं. राजपालचं लग्नही याच ठिकाणी  झालं होतं. ज्योतीचा नवरा उत्तर प्रदेशातील इटावाचा रहिवासी आहे. तो आग्य्रात गेल्या दोन वर्षांपासून बँकेत कॅशियर म्हणून कार्यरत आहे.

करुणा यांच्या निधनानंतर 10 जून 2003 रोजी राजपालने राधासोबत लग्न केलं. दोघांना हनी नावाची मुलगी आहे. 'हिरो' चित्रपटाच्या शूटिंगसाठी राजपाल कॅनडाला गेला होता. त्यावेळी कॉमन फ्रेण्डच्या माध्यमातून त्याची ओळख राधाशी झाली.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actor Rajpal Yadav’s daughter Jyoti marries bank manager latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV