अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा बाबा झाला!

गुरुवारी स्वप्निलची पत्नी लीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

अभिनेता स्वप्नील जोशी पुन्हा बाबा झाला!

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीचा चॉकलेट हिरो अर्थात अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी गोड बातमी आहे. स्वप्नील पुन्हा एकदा बाबा झाला आहे. स्वप्नील जोशीला पुत्ररत्न प्राप्त झालं.

गुरुवारी स्वप्निलची पत्नी लीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. या बातमीमुळे जोशी कुटुंबीयांसह मित्र-मंडळींमध्येही आनंदाचं वातावरण आहे.

गेल्याच वर्षी स्वप्निल-लीना यांच्या आयुष्यात छोट्या परीचं आगमन झालं होतं. मे 2016 मध्ये स्वप्नील-लीनाची मुलगी मायराचा जन्म झाला होता.

स्वप्नील जोशीच्या 'मुंबई-पुणे-मुंबई 3' या सिनेमाचं शूटिंग नुकतंच सुरु झालं आहे. तर स्वप्नीलची निर्मिती असलेली 'नकळत सारे घडले' ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actor Swwapnil Joshi blessed with baby boy latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV