फिट टू फॅट, अभिनेता उदय चोप्रा आता असा दिसतो!

2013 मध्ये आलेल्या 'धूम-3' नंतर उदय चोप्रा कोणत्याही सिनेमात दिसला नाही.

By: | Last Updated: > Saturday, 7 October 2017 1:07 PM
Actor Uday Chopra looks recognizable in his latest pictures!

मुंबई : ‘मोहब्बतें’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेता उदय चोप्राला फारसं यश मिळालं नाही, पण तो चर्चेत मात्र राहिला. मात्र नुकतेच त्याचे काही फोटो समोर आले जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का जरुर बसेल.

इम्रान हाश्मीच्या वांद्र्यातील घराबाहेर असताना उदय चोप्रा कॅमेऱ्यात कैद झाला. बऱ्याच काळाने कॅमेऱ्यासमोर आलेल्या उदय चोप्राचा लूक फारच बदलला आहे, शिवाय त्याचं वजनही वाढलं आहे. इतकंच नाही तर दाढीही पांढरी झाली आहे. काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि जीन्समध्ये असलेल्या उदयने टोपी घातली होती. त्यामुळे एक क्षण हाच उदय चोप्रा आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

Uday_Chopra_1

सोशल मीडियावर त्याच्या नवीन लूकची थट्टा होत आहे. दंगल 2 मध्ये उदय चोप्रा आमीर खानला रिप्लेस करणार असल्याचं ट्वीट काहींनी केलं आहे. तर मोदींच्या बायोपिकसाठी उदय चोप्रा योग्य चॉईस असल्याचं काहींनी म्हटलं आहे.

 


2013 मध्ये आलेल्या ‘धूम-3’ नंतर उदय चोप्रा कोणत्याही सिनेमात दिसला नाही.

Uday_Chopra_6

असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरची सुरुवात
उदय चोप्राने  1991 मध्ये आलेल्या ‘लम्हे’ सिनेमातून असिस्टंट डायरेक्टर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर 2000 मध्ये ‘मोहब्बतें’ सिनेमातून त्याने अभिनयात पदार्पण केलं. त्याने ‘मेरे यार की शादी है’ (2002), ‘धूम’ (2004), ‘नील अँड निक्की’ (2005), ‘धूम 2’ (2006), ‘धूम 3’ (2013) या सिनेमात काम केलं आहे.

2012 मध्ये स्वत:च्या कंपनीची सुरुवात
उदय चोप्राने 2012 मध्ये ‘योमिक’ कंपनीची स्थापना केली. तो यशराज फिल्म्सचा मॅनेजरही आहे. 2014 मधील ‘ग्रेस ऑफ मोनॅको’ आणि ‘द लॉन्गेस्ट वीक’ या चित्रपटांची निर्मितीही केली आहे. या सिनेमातून यशराज एन्टरटेन्मेंटने हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.

उदय चोप्रा  यश चोप्रा यांचा मुलगा आणि निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्राचा धाकटा भाऊ आहे.

नर्गिस फाखरीसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत
उदय त्याच्या सिनेमांपेक्षा रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत राहिला. अभिनेत्री नर्गिस फाखरीसोबत तिचं नाव जोडलं होतं. दोघेही गोव्यात सीक्रेट व्हेकेशन करताना दिसले होते. मात्र नंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचं वृत्त आलं.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Actor Uday Chopra looks recognizable in his latest pictures!
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार
काजोलच्या 'मुलाला' सिनेमात भूमिका देण्यास करण जोहरचा नकार

मुंबई : ‘कभी खुशी कभी गम’ सिनेमातील शाहरुख आणि काजोलच्या मुलाची

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 19/10/2017

1. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन तीव्र, धुळ्यात अर्धनग्न

दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश
दिवाळीनिमित्त सनी लिओनीचा चाहत्यांना खास संदेश

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीनं दिवाळीनिमित्त आपल्या चाहत्यांना एक

ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप
ट्विटर अकाऊंट सस्पेंड, कमाल खानचा आमीरवर दोषारोप

मुंबई : ट्विटरवर बॉम्ब फोडणारा अभिनेता कमाल खानलाच ट्विटरने दिवाळी

'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर
'पद्मावती'च्या रांगोळीची नासधूस, दीपिकाला संताप अनावर

सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला

'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा
'पद्मावती'ला विरोध, राजपूत करनी सेनेचा सुरतमध्ये राडा

सुरत : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमाला

विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो
विराट-अनुष्काचे दिवाळी विशेष फोटो

मुंबई: टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री

जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज
जयंती विशेष : स्मिता पाटील यांचे मृत्यूनंतर 14 सिनेमे रीलिज

मुंबई : जेव्हा जेव्हा चित्रपटविश्वातील संवेदनशील कलाकारांचा

सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज
सनी-अरबाज यांच्या 'तेरा इंतजार' सिनेमाचा टीजर रिलीज

मुंबई : सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!
धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी चित्रपटात!

मुंबई : लाखो चाहत्यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षित अखेर मराठी