अभिनेता विक्रमची कन्या करुणानिधींच्या नातवासोबत विवाहबंधनात

करुणानिधी यांचे आशिर्वाद घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा फोटो विक्रमतर्फे शेअर करण्यात आला आहे.

अभिनेता विक्रमची कन्या करुणानिधींच्या नातवासोबत विवाहबंधनात

चेन्नई : दक्षिणेच्या मनोरंजन आणि राजकीय विश्वामध्ये आणखी एक लग्नसोहळा पाहायला मिळत आहे. सुप्रसिद्ध अभिनेता विक्रम आणि यांची कन्या अक्षिता ही द्रमुकचे प्रमुख एम करुणानिधी यांचा नातू मनू रंजितसोबत विवाहबंधनात अडकली.

94 वर्षीय करुणानिधी यांचे आशिर्वाद घेतल्यानंतर संपूर्ण कुटुंबाचा फोटो विक्रमतर्फे शेअर करण्यात आला आहे. चेन्नईतील करुणानिधींच्या निवासस्थानी हा विवाहसोहळा पार पडला. 31 तारखेला भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे.
गेल्यावर्षी मनू रंजित आणि अक्षिता यांचा साखरपुडा झाला होता.

1992 मध्ये अभिनेता विक्रमचं मानसशास्त्राची शिक्षिका असलेल्या शैलजा बालकृष्णनशी लग्न झालं होतं. विक्रमला अक्षिता आणि ध्रुव अशी दोन अपत्यं आहेत. ध्रुव सध्या चित्रपटामध्ये करिअर करण्याच्या तयारीत आहे.

सेतू, कासी, रावणन, थांडवम अशा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या विक्रमला पिथामगन चित्रपटातील भूमिकेसाठी 2003 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विक्रमची भूमिका असलेले अपरिचित, आय यासारखे काही चित्रपट हिंदीत डब होऊन महाराष्ट्रात प्रदर्शितही झाले होते.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actor Vikram’s Daughter Akshita Marries Karunanidhi’s Great Grandson Manu Ranjith latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV