अभिनेत्री असिन आई बनली, पहिल्या बाळाचं आगमन

असिनचा पती राहुल शर्माने पहिल्या बाळाच्या आगमनाची गोड बातमी सांगितली. शिवाय शुभेच्छा देणाऱ्यांचे आभारही मानले.

अभिनेत्री असिन आई बनली, पहिल्या बाळाचं आगमन

मुंबई : सोहा अली खान, ईशा देओल यांच्यापाठोपाठ आता असिन थोट्टूमकलही आई बनली आहे. 'गजनी' सिनेमाची अभिनेत्री असिनने मंगळवारी मुलीला जन्म दिला.

असिनचा पती राहुल शर्माने पहिल्या बाळाच्या आगमनाची गोड बातमी सांगितली. शिवाय शुभेच्छा देणाऱ्यांचे आभारही मानले.

https://twitter.com/rahulsharma/status/922876954742845440

असिनने 19 जानेवारी 2016 रोजी मायक्रोमॅक्सचा संस्थापक राहुल शर्मासोबत लग्न केलं होतं. पहिल्यांदा ख्रिश्चन रिवाजानुसार चर्चमध्ये आणि नंतर हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला.

या दाम्पत्याने प्रेग्नंसीविषयी अतिशय गुप्तता बाळगली होती. मंगळवारी त्यांनी एक परिपत्रक काढून नन्ही परी घरात आल्याची गोड बातमी शेअर केली. "आम्हा दोघांसाठी मागचे 9 महिने फारच स्पेशल आणि रोमांचक होते. आमच्यासाठी प्रार्थना करणारे आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार," असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

अभिनेत्री असिनने 'गजनी' या सिनेमातून 2008 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 100 कोटी क्लबची अभिनेत्री म्हणूनही ती प्रसिद्ध आहे. याशिवाय सलमान खानसोबत रेडी सिनेमातही ती झळकली होती. परंतु लग्न झाल्यावर तिने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या

असिन आणि 'मायक्रोमॅक्स'चा सर्वेसर्वा राहुल शर्मा विवाहबंधनात

'मीच असिन आणि राहुलची ओळख करुन दिली होती'

अभिनेत्री असिन लवकरच लग्नबंधनात, अरबपती उद्योजकाशी लग्न ठरलं!

लग्नानंतर असिनचा बॉलिवूडला रामराम?

अभिनेत्री असीनची लग्नपत्रिका

असिनच्या नवऱ्यासोबत अक्षयकुमारचा क्रिकेट सामना

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV