अभिनेत्री नेहा धुपियाच्या कारला अपघात

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या कारला चंदीगडमध्ये अपघात झाल्याचं वृत्त समजतं आहे.

By: | Last Updated: > Friday, 11 August 2017 9:41 PM
Actress Neha Dhupia’s car accident in Chandigarh latest update

फाईल फोटो

चंदीगड : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिच्या कारला आज (शुक्रवार) चंदीगडमध्ये अपघात झाल्याचं वृत्त समजतं आहे. विमानतळावर जात असताना तिच्या कारला अपघात झाला. सुदैवानं या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नाही. ‘नो फिल्टर नेहा’ या शोच्या प्रमोशनसाठी नेहा चंदीगडला आली होती.

 

या अपघातामुळे रस्त्यावर मात्र वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी नेहा धुपिया तब्बल तासभर रस्त्यालगतच उभी होती. सुदैवानं या अपघातात नेहा धुपिया किंवा तिच्या टीममधील कुणीही जखमी झालं नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार, नेहाच्या खांद्याला छोटीशी दुखापत झाली आहे.

 

या अपघातनंतर नेहाला मदत करण्याऐवजी लोकांनी थेट तिच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. तर काही जणांनी ऑटोग्राफही घेतली.

 

‘नो फिल्टर नेहा’ हा एक ऑडिओ चॅट शो आहे. जो चंदीगड आणि आसपासच्या भागात बराच प्रसिद्ध आहे. या शोमध्ये नेहा सिनेजगतातील आपल्या काही खास मित्रांशी चॅट करते. त्यावेळी ती अशा काही गोष्टी सांगते की, ज्या आजवर आपण ऐकलेल्या नाहीत. या शोचा पहिला सीजन बराच हिट झाला होता. आता या शोचं दुसरं पर्व येणार आहे.

 

 

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Actress Neha Dhupia’s car accident in Chandigarh latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात

ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा
ड्रग्ज प्रकरणातील ममता कुलकर्णीचा केनियाहून दुबईला पोबारा

नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करी प्रकरणी फरार घोषित करण्यात आलेली कोणे

आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!
आला रे आला गणेशा... ‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

मुंबई : कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या

सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री
सिद्धार्थ-जॅकलीनच्या किसला सेन्सॉर बोर्डाकडून 70 टक्के कात्री

मुंबई : सेन्सॉर बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवण्यापूर्वी पहलाज

‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!
‘शोले’ची 42 वर्षे… पहिल्या समीक्षणात बिग बींचं नावही नव्हतं!

मुंबई : सुपरहिट ‘शोले’ सिनेमाच्या प्रदर्शनाला आज 42 वर्षे पूर्ण झाली.

... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?
... म्हणून अक्षय कुमारने कपिलच्या शोमध्ये जाणं टाळलं?

नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या

मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत
मी बोअरिंग असल्याने 'ती'ने मला सोडलं : सुशांतसिंग राजपूत

मुंबई : ‘बॉलिवूडमधला प्रॉमिसिंग चेहरा’ अशी ख्याती असलेला

अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..
अभिनेता फरदीन खान पुन्हा बाबा झाला, बाळाचं नाव..

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरदीन खान दुसऱ्यांदा बाबा झाला. फरदीनने

सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!
सुनिधी चौहानच्या घरी लवकरच पाळणा हलणार!

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान लवकरच आई बनणार आहे.

बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?
बर्थ डे स्पेशल: सातवी शिकलेला जॉनी लिव्हर कसा झाला कॉमेडीचा बादशाह?

मुंबई: बॉलिवूडमधील खराखुरा कॉमेडीयन म्हणून ज्यांची ओळख आहे, ते