'साहो'मधील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक रिलीज

'साहो' हा एक अॅडव्हेंचर फॅण्टसी चित्रपट आहे. यामधून श्रद्धा तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'साहो' तेलुगूशिवाय हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.

'साहो'मधील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : बहुप्रतिक्षीत 'साहो' चित्रपटातील श्रद्धा कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. यामध्ये श्रद्धा काहीशी रागात दिसत आहे. पण सोशल मीडियावर तिच्या लूकला पसंती मिळत आहे.'साहो' चित्रपटात अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याआधी प्रभासच्या 38व्या वाढदिवसाला 'साहो'चा फर्स्ट लूक जारी करण्यात आला होता. या सिनेमात प्रभास अंदाज फारच वेगळा आहे.

'साहो' हा एक अॅडव्हेंचर फॅण्टसी चित्रपट आहे. यामधून श्रद्धा तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'साहो' तेलुगूशिवाय हिंदीतही प्रदर्शित होणार आहे.

अॅक्शनचा तडका असलेल्या या सिनेमात नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, चंकी पांडे आणि मंदिरा बेदी हे कलाकारही दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टंट सीन चित्रीत करण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटासाठी हॉलिवूडचे अॅक्शन डायरेक्टर केनी बॅट्स यांची निवड केली आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Actress Shraddha Kapoor’s first look from Saaho is revealed
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV