अभिनेत्री सोहा अली खानच्या घरी नन्ही परी

नवरात्रीत सोहाला मुलगी झाल्यानं पतौडी आणि खेमू कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अभिनेत्री सोहा अली खानच्या घरी नन्ही परी

मुंबई : अभिनेत्री सोहा अली खानच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. सोहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात सोहाची डिलीव्हरी झाली.

सोहाची आई अर्थात अभिनेत्री शर्मिला टागोर आणि पती म्हणजेच अभिनेता कुणाल खेमू सोहासोबत रुग्णालयात आहेत. सोहा आणि बाळ सुखरुप असल्याची माहिती कुणालने ट्विटरवरुन दिली आहे.

https://twitter.com/kunalkemmu/status/913627240528699398

नवरात्रीत सोहाला कन्यारत्न प्राप्त झाल्यानं पतौडी आणि खेमू कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण आहे. काहीच महिन्यांपूर्वी सोहाचा भाऊ सैफ अली खान आणि वहिनी करिना कपूरला मुलगा झाला होता. त्यामुळे छोट्या तैमूरला खेळण्यासाठी बहीण मिळाली आहे.

एप्रिल महिन्यात सोहाचा बेबी बम्प दिसायला लागल्यानंतर चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर कुणालने ट्विटरवरुन या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला होता. सोहा आणि कुणाल यांचा 25 जानेवारी, 2015 रोजी विवाहबंधनात अडकले होते.

सोहाने 2004 मध्ये 'दिल मांगे मोअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिचे 'रंग दे बसंती', 'साहेब बिवी और गँगस्टर रिटर्न्स' यासारखे काही चित्रपट गाजले. 2016 मध्ये रिलीज झालेले '31 ऑक्टोबर' आणि 'घायल वन्स अगेन' हे तिचे प्रेग्नन्सीपूर्वीचे शेवटचे चित्रपट होते.

कुणाल खेमूची भूमिका असलेला रोहित शेट्टीचा 'गोलमाल अगेन' लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV