जिग्नेश मेवाणीला विजयाच्या शुभेच्छा देणारी बॉलिवूड अभिनेत्री ट्रोल

अभिनेत्री स्वरा भास्करने जिग्नेश मेवाणीला ट्विटरवरुन शुभेच्छा देताच तिला ट्रोल करण्यात आलं.

जिग्नेश मेवाणीला विजयाच्या शुभेच्छा देणारी बॉलिवूड अभिनेत्री ट्रोल

मुंबई : गुजरात विधानसभेच्या निकालानंतर अपक्ष उमेदवार जिग्नेश मेवाणीला विजयाच्या शुभेच्छा देणं बॉलिवूड अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं. अभिनेत्री स्वरा भास्करने जिग्नेश मेवाणीला ट्विटरवरुन शुभेच्छा देताच तिला ट्रोल करण्यात आलं.

swara 1

जिग्नेश मेवाणी यांनी वडगाम विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवाराचा 21 हजार मतांनी पराभव केला. जिग्नेश मेवाणी यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. कारण या मतदारसंघात काँग्रेसने एकही उमेदवार उभा केला नव्हता.

swara 2

स्वरा भास्करने जिग्नेश मेवाणीला शुभेच्छा देताच ट्रोलर्सने तिच्यावर तोंडसुख घेतलं. तिच्यावर आक्षेपार्ह शब्दांचाही वापर करण्यात आला. दरम्यान, तिने कुणाच्याही कमेंटला रिप्लाय दिला नाही.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: actress trolled after congratulating Jignesh mewani
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV