'सोनू...' गाण्यामुळे रिअल लाईफ सोनूंची चिडवाचिडवी

आधी शांताबाईच्या गाण्यानं धुमाकूळ घातला. शांताबाई शांत होत नाही तोच 'आला बाबुराव'नं राज्यभर दणका उडवला. आता त्यावर कळस गाठला आहे तो सोनूनं.

'सोनू...' गाण्यामुळे रिअल लाईफ सोनूंची चिडवाचिडवी

पिंपरी : 'सोनू, तुझा माझ्यावर भरवसा न्हाय काय?' या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गाण्याच्या अनेक
आवृत्त्या पाहायला मिळत आहेत. मलिष्कापासून पाकिस्तानी तरुणांपर्यंत अनेकांनी 'सोनू'ची गाणी गायली, मात्र त्यामुळे सोनू नाव असणाऱ्या मुला-मुलींनी आपली थट्टा होत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

आधी शांताबाईच्या गाण्यानं धुमाकूळ घातला. शांताबाई शांत होत नाही तोच 'आला बाबुराव'नं राज्यभर दणका उडवला. आता त्यावर कळस गाठला आहे तो सोनूनं.

या गाण्यामुळे आपल्याला तोंड उघडण्याची सोय राहिलेली नाही. कशावर मत व्यक्त केलं की "सोनू तुझा माझ्यावर भरवसा न्हाय काय?" असं म्हणून त्यांचे मित्र-मैत्रिण आणि कुटुंबीय त्यांची टर उडवतात. यामुळे संतापलेल्या 'सोनू' नावाच्या मुला-मुलींनी न चि़डवण्याचं जाहीर आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या


सोनूच्या या गाण्यानं अनेकांची तारांबळ उडाली असताना काही सोनू मात्र या गाण्याकडे मनोरंजन म्हणून पाहत त्याचा आनंद घेत आहेत. कुठलीही गोष्ट मर्यादेत केली, तर त्याची गोडी कायम राहते. या थट्टेला सीमा घातली नाही, तर संतापलेल्या सोनूचा उद्रेक तुम्हाला सहन करावा लागेल.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV