'अभिमान'चा रिमेक, 'हे' रिअल लाईफ जोडपं चित्रपटात

हृषिकेष मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला 'अभिमान' 1973 मध्ये रिलीज झाला होता. तब्बल 45 वर्षांनंतर या क्लासिक सिनेमाचा रिमेक करण्यासाठी जुळवाजुळव सुरु आहे.

'अभिमान'चा रिमेक, 'हे' रिअल लाईफ जोडपं चित्रपटात

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची मुख्य भूमिका असलेला 'अभिमान' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचा रिमेक होणार असून बच्चन यांची पुढची पिढीच या चित्रपटाच झळकण्याची चिन्हं आहेत. अभिषेक-ऐश्वर्या या सिनेमात दिसण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

हृषिकेष मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला 'अभिमान' 1973 मध्ये रिलीज झाला होता. तब्बल 45 वर्षांनंतर या क्लासिक सिनेमाचा रिमेक करण्यासाठी जुळवाजुळव सुरु आहे. तामिळ छायाचित्रकार-दिग्दर्शक राजीव मेनन यांनी ही धुरा खांद्यावर घेण्याची तयारी दर्शवली आहे.

अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि सूनबाईच ही भूमिका साकारतील, असं राजीव यांच्या डोक्यात आहे. अभिषेक-ऐश्वर्याने दोन महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्हमध्ये अभिमानच्या रिमेकमध्ये भूमिका करण्यास उत्सुक नसल्याचं सांगितलं होतं. मात्र अचानक अभि-अॅशच ही भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

abhishek-aishwarya-rai

अभिमान चित्रपटात पार्श्वगायक जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. पत्नीला पतीपेक्षा जास्त यश मिळाल्यामुळे पतीचा दुखावलेला अभिमान आणि त्यांच्या नात्यात आलेला दुरावा, 'अभिमान'मध्ये पाहायला मिळाला.

मणिरत्नम यांच्या 'रावण' चित्रपटानंतर म्हणजेच गेल्या सात वर्षांत अभिषेक-ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेले नाहीत. यापूर्वी ढाई अक्षर प्रेम के, कुछ ना कहो, गुरु, उमराव जान, धूम 2, सरकार राज यासारख्या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र भूमिका केल्या होत्या.

या वर्षात (2017) अभिषेकचा एकही चित्रपट रीलिज झालेला नाही. गेल्या वर्षी (2016) त्याचा हाऊसफुल 3, तर 2015 मध्ये ऑल इज वेल हे एकमेव सिनेमे रीलिज झाले. गेल्या काही वर्षात अभिषेकचा एकही सोलो हिट आलेला नाही.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV