ऐश्वर्याने मला IVF द्वारे जन्म दिला, 29 वर्षीय तरुणाचा दावा

लंडनमध्ये 1988 साली ऐश्वर्याने आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे मला जन्म दिला. वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत मी आजी वृंदा कृष्णराज राय यांच्यासोबत मुंबईत होतो, असा दावा तरुणाने केला आहे

ऐश्वर्याने मला IVF द्वारे जन्म दिला, 29 वर्षीय तरुणाचा दावा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही माझी आई आहे, असा अजब दावा आंध्र प्रदेशातील 29 वर्षीय तरुणाने केला आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे तिने आपल्याला जन्म दिल्याचं त्याने म्हटलं आहे.

1988 मध्ये ऐश्वर्याने आपल्याला जन्म दिला, असा आरोप संगीत कुमारने केला आहे. ऐश्वर्याचा जन्म 1 नोव्हेंबर 1973 रोजी झाला. म्हणजेच 1988 मध्ये ऐश्वर्या अवघी 15 वर्षांची होती.

'लंडनमध्ये 1988 साली ऐश्वर्याने आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे मला जन्म दिला. वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत मी आजी (ऐश्वर्याची आई) वृंदा कृष्णराज राय यांच्यासोबत मुंबईत होतो. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून 27 व्या वर्षापर्यंत मी चोदावरममध्ये वाढलो.' असा दावा संगीत कुमारने केला आहे.

एप्रिल 2017 मध्ये माझे आजोबा कृष्णराज राय यांचं निधन झालं. (प्रत्यक्षात त्यांची प्राणज्योत 18 मार्च 2017 रोजी मालवली) माझ्या मामाचं नाव आदित्य राय आहे, असं त्याने गेल्या आठवड्यात मंगळुरुमध्ये पत्रकारांना सांगितलं. संगीतकडे आपल्या दाव्याचे कोणतेही पुरावे नाहीत.

'माझी आई ऐश्वर्या पती अभिषेक पासून विभक्त झाली असून एकटीच राहते. त्यामुळे आईने मंगळुरुत येऊन माझ्यासोबत राहावं. 27 वर्षांपासून मी तिच्याशिवाय राहत आहे. मला तिची खूप आठवण येते. मला विशाखापट्टणमवा जायचं नाही. किमान मला माझ्या आईचा फोन नंबर द्या' अशी मागणीही त्याने केली आहे.

नातेवाईकांच्या दबावामुळे इतकी वर्ष आपण गप्प राहिलो, असा दावाही तरुणाने केला आहे. 'लहानपणापासून माझ्या नातेवाईकांनी मला रोखून ठेवलं, माझ्यापासून माहिती दडवण्यात आली. मात्र आता मला सगळं समजलं आहे. आता मला आई हवी' असंही संगीत म्हणतो.

वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1994 मध्ये ऐश्वर्याने मिस इंडिया स्पर्धेत दुसरं स्थान मिळवलं. त्यानंतर तिने मिस वर्ल्डचा किताब पटकवला. 1997 मध्ये तिने इरुवर या तामिळ चित्रपटात भूमिका केली. हा तिचा पहिला सिनेमा होता. त्याच वर्षी 'और प्यार हो गया' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

14 जानेवारी 2007 रोजी अभिषेक-ऐश्वर्या यांचा साखरपुडा झाला, तर 20 एप्रिल 2007 रोजी ते विवाहबंधनात अडकले. 16 नोव्हेंबर 2011 रोजी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला.

ऐश्वर्याची मुख्य भूमिका असलेल्या फॅनी खान या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरु आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव, अनिल कपूर झळकणार आहेत.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aishwarya Rai Bachchan is my mother, gave birth to me via IVF, 29 years old youth claims latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV