'आपला मानूस', अजय देवगण मराठीत झळकणार

‘आपला मानूस’ असं या सिनेमाचं नाव आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

'आपला मानूस', अजय देवगण मराठीत झळकणार

मुंबई : बॉलिवूडला कारकीर्दीतले 25 वर्षे दिल्यानंतर अजय देवगण अखेर मराठीत दिसणार आहे. आपली अनेक दिवसांची इच्छा पूर्ण होत असल्याचं त्याने एका व्हिडिओतून म्हटलं आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सतीश राजवाडे यांच्यावर असून ‘आपला मानूस’ असं या सिनेमाचं नाव आहे. 9 फेब्रुवारी 2018 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

अजय देवगणने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत ही बातमी चाहत्यांना दिली. 'महाराष्ट्रासोबत माझं नातं जन्मापासूनचं आहे. मराठी भाषेसाठी मनात पहिल्यापासूनच आदर आहे. पण काजोलशी लग्न झाल्यापासून महाराष्ट्राची भाषा, संस्कृतीच्या आणखी जवळ आलो.

या संस्कृतीवर प्रेम जडलं. या संस्कृतीमुळेच मराठी चित्रपटांची आज एक वेगळी ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग होण्यासाठी 'आपला माणूस'मधून मी तुमच्यापुढं येत आहे,' असं अजय देवगणने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, इरावती हर्षे अशी स्टारकास्ट दिसणार आहे.

दरम्यान, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही अजय देवगण आणि काजोलला या सिनेमाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा व्हिडिओ :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ajay devgan to debut in Marathi by aapla manus movie
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV