शाहरुखनंतर आता अजय देवगन हॉकी प्रशिक्षकाच्या भूमिकेत

अजयने ही ऑफर स्वीकारल्यास हा त्याची पहिलीच स्पोर्ट्स मूव्ही ठरेल.

शाहरुखनंतर आता अजय देवगन हॉकी प्रशिक्षकाच्या भूमिकेत

मुंबई : 'चक दे इंडिया' चित्रपटात शाहरुख खानने हॉकी कोचची भूमिका साकारल्यानंतर अभिनेता अजय देवगनही हे आव्हान पेलण्याच्या तयारीत आहे. ही ऑफर स्वीकारल्यास अजयचा हा पहिलाच स्पोर्ट्स बेस्ड चित्रपट ठरेल.

'मॉम' चित्रपटाचे दिग्दर्शक रवी उदयावर आपल्या आगामी सिनेमासाठी अजय देवगनला साईन करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये अजय देवगन हॉकी प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारणार असल्याची माहिती आहे. निर्माते बोनी कपूर यांच्याशी बोलणी सुरु असून रवी लवकरच सिनेमावर काम सुरु करणार आहेत.

अजय देवगनने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली असून लवकरच तो निर्णय कळवणार आहे. अजयने ही ऑफर स्वीकारल्यास हा त्याची पहिलीच स्पोर्ट्स मूव्ही ठरेल.

अजय देवगन सध्या 'रेड' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसात या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण होणार असून त्यानंतर तो इंद्र कुमार यांच्या 'टोटल धमाल'मध्ये दिसणार आहे. अजयची निर्मिती असलेला 'आपला मानूस' हा मराठी चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Ajay Devgn may seen as Hockey Coach in Next movie latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV