परशाचा नव्या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Friday, 14 April 2017 4:32 PM
परशाचा नव्या सिनेमातील फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : ‘सैराट’ फेम आकाश ठोसर म्हणजेच परशाचा नवा सिनेमा एफयूचं पोस्टर रिलीज  झालं आहे. यामध्ये आकाश ठोसरचा पहिला लूक समोर आला आहे. यापूर्वी सलमान खानच्या हस्ते सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता.

प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांचा हा सिनेमा असून, सैराटमध्ये परशा ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आकाश ठोसरची ‘एफयू’मध्येही मुख्य भूमिका असणार आहे. 2 जून रोजी आकाशचा हा नवा सिनेमा रिलीज होणार आहे.

akash thosar

अभिनेता आकाश ठोसरच्या सैराटमधील भूमिकेमुळे त्याच्या पुढच्या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर महेश मांजरेकरांच्या ‘एफयू’मधून आकाश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’मधून आकाश ठोसर महाराष्ट्रासह देशभर पोहोचला. मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडनेही सैराट आणि त्यातील कलाकारांचं भरभरुन कौतुक केलं होतं.

वेगवेगळे विषय घेऊन सिनेमे करणारे निर्माते-दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकरांची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. तर दुसरीकडे आकाश ठोसरने आतापर्यंत फक्त एकाच सिनेमात म्हणजे ‘सैराट’मध्येच काम केलं आहे. त्यामुळे महेश मांजरेकर आकाशला कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आणणार आहेत, याची सिनेरसिकांसह चित्रपटसृष्टीलाही उत्सुकता लागली आहे.

संबंधित बातमी :  परशाचा नवा सिनेमा, सलमानकडून फर्स्ट लूक रिलीज

First Published: Friday, 14 April 2017 4:32 PM

Related Stories

‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई
‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी...

नवी दिल्ली : मोस्ट अवेटेड ‘बाहुबली 2’ प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची

अक्षयच्या संकल्पनेतील जवानांच्या वेबसाईटला देणाऱ्यांचे हजारो हात
अक्षयच्या संकल्पनेतील जवानांच्या...

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार याच्या संकल्पनेतून

उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..
उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये...

उस्मानाबाद : ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’ या बहुप्रतीक्षित

जळगावातील चिमुरडीवर उपचारांसाठी सलमान खानची मदत
जळगावातील चिमुरडीवर उपचारांसाठी...

जळगाव : जळगावात रक्तवाहिनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या

मधुर भांडारकरांची सुपारी देणाऱ्या अभिनेत्रीला जेल
मधुर भांडारकरांची सुपारी देणाऱ्या...

मुंबई: दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या

अंडरटेकरची भेट, ते मानधन, 'बाहुबली'च्या 15 फॅक्ट्स !
अंडरटेकरची भेट, ते मानधन,...

मुंबई: ‘बाहुबली 2’ सिनेमा आज रिलीज झाला. कटप्पाने बाहुबलीला का

'बाहुबली 2' पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
'बाहुबली 2' पैसा वसूल, प्रेक्षकांच्या...

मुंबई: मोस्ट अवेटेड चित्रपट ‘बाहुबली द कन्क्लुजन’ अर्थात

...तर अमित ठाकरे 'एफयू'चे हिरो असते!
...तर अमित ठाकरे 'एफयू'चे हिरो असते!

मुंबई : ‘सैराट’फेम आकाश ठोसरच्या ‘एफयू’ या आगामी चित्रपटाचं

ऋषी कपूर यांचा बॉलिवूडच्या नव्या पिढीविरोधात संताप
ऋषी कपूर यांचा बॉलिवूडच्या नव्या...

मुंबई : खलनायक, अभिनेता, संन्यासी आणि राजकारणी असं बहुआयामी जीवन

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार?
कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर...

मुंबई : कटप्पाने बाहुबली को क्यों मारा या, बहुप्रतीक्षित प्रश्नाचं