'अक्सर-2'चा दुसरा ट्रेलर रिलीज, जरीन खानचा बोल्ड अवतार

जरीन खानसोबतच गौतम रोडे, अभिनव शुक्ला आमि मोहित मदानही या सिनेमात आहेत. मात्र मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडलेला श्रीशांत 'अक्सर-2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे.

'अक्सर-2'चा दुसरा ट्रेलर रिलीज, जरीन खानचा बोल्ड अवतार

मुंबई : 'अक्सर-2'चा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेत्री जरीन खानचा ग्लॅमरस अवतार यात दिसून येतो. तर मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटच्या जगतातून बाहेर पडलेला श्रीशांत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. श्रीशांतचाही लूक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

सुमारे महिन्याभरापूर्वी 'अक्सर-2'चा पहिला ट्रेलर रिलीज झाला होता. त्यानंतर आता दुसरा ट्रेलर रिलीज झाला असून, यामध्येही जरीन खानचा बोल्ड अंदाज आहे.

जरीन खानसोबतच गौतम रोडे, अभिनव शुक्ला आमि मोहित मदानही या सिनेमात आहेत. मात्र मॅच फिक्सिंगमुळे क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडलेला श्रीशांत 'अक्सर-2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे.

17 नोव्हेंबर रोजी रिलीज होणाऱ्या 'अक्सर-2' सिनेमा 2006 सालच्या इम्रान हाश्मी आणि उदिता गोस्वामीच्या 'अक्सर' सिनेमाचा सिक्वेल आहे. इम्रान आणि उदिताच्या बोल्ड सीनमुळे त्यावेळी खूप चर्चा झाली होती.

पाहा ट्रेलर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Aksar 2 second trailer released latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV