सुकमा हल्ला, शहीद जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची एक कोटींची मदत

By: | Last Updated: > Thursday, 16 March 2017 11:53 PM
akshay kumar donates 1 crore to martyrs in sukma attack

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं जवानांविषयी असलेलं प्रेम सर्वश्रुत आहे. यावेळीही तो जवानांसाठी धावून आला आहे. छत्तीसगडच्या सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या 12 जवानांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारने 1 कोटी 8 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते. त्यानंतर अक्षय कुमारने या जवानांची माहिती घेऊन त्यांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्य करण्याची इच्छा व्यक्त केली.

सीआरपीएफनेही एका पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. अक्षय कुमार सुकमा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 9 लाख रुपयांची मदत करणार आहे, अशी माहिती सीआरपीएफने दिली.

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी हल्ल्यात 12 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. भेज्जी परिसरात सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सर्व शहीद जवान सीआरपीएफच्या 219 व्या बटालियनचे होते.

रस्ते निर्माण सुरक्षेसाठी असलेल्या जवानांना निशाणा साधत नक्षलवाद्यांनी सुरुवातीला आयईडी ब्लास्ट केला, त्यानंतर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी 9 जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

इतकंच नाही तर नक्षलवाद्यांनी जवानांची हत्यारं, रेडिओ सेट आणि इतर सामान लूटलं होतं.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:akshay kumar donates 1 crore to martyrs in sukma attack
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

मासूम, वाँटेड फेम अभिनेता इंदर कुमारचं निधन
मासूम, वाँटेड फेम अभिनेता इंदर कुमारचं निधन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इंदर कुमारचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 43

इंदू सरकार चित्रपटाचे शो काँग्रेसने बंद पाडले
इंदू सरकार चित्रपटाचे शो काँग्रेसने बंद पाडले

मुंबई : प्रदर्शनच्या पहिल्याच दिवशी मधुर भांडारकरांच्या ‘इंदू

काजोल करण जोहरसोबत कधीच सिनेमा करणार नाही!
काजोल करण जोहरसोबत कधीच सिनेमा करणार नाही!

मुंबई : काजोल, शाहरुख आणि करण जोहर हे कोणे एके काळी बॉलिवूडमधलं बेस्ट

...तर संजय दत्तला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल : सरकार
...तर संजय दत्तला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल : सरकार

मुंबई : व्हीआयपी स्टेटसमुळे नियमांचं उल्लंघन करुन अभिनेता संजय

ब्रिटीश बॉयफ्रेण्डला मिठी मारताना श्रुती हासन कॅमेऱ्यात कैद
ब्रिटीश बॉयफ्रेण्डला मिठी मारताना श्रुती हासन कॅमेऱ्यात कैद

मुंबई : अभिनेत्री श्रुती हासन सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या कामात

प्रेमकहाणी संपली, दीपिका-रणवीरचं ब्रेकअप
प्रेमकहाणी संपली, दीपिका-रणवीरचं ब्रेकअप

मुंबई : दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह हे बॉलिवूडमधील बेस्ट कपलपैकी

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीला शिवराळ ट्वीट, चौघांवर गुन्हा
अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीला शिवराळ ट्वीट, चौघांवर गुन्हा

मुंबई : गायिका-अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने ट्विटरवर

जवानांसाठी जनतेकडून 1 टक्के सेस आकारावा : अक्षयकुमार
जवानांसाठी जनतेकडून 1 टक्के सेस आकारावा : अक्षयकुमार

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार

'अंदाज अपना-अपना'च्या सिक्वेलमधून आमीर-सलमानला डच्चू
'अंदाज अपना-अपना'च्या सिक्वेलमधून आमीर-सलमानला डच्चू

मुंबई : आमीर खान, सलमान खान, करिष्मा कपूर आणि रवीना टंडन या चौकडीचा 90

तमन्ना-नवाझच्या चित्रपटात अमृता फडणवीसांचं पार्श्वगायन
तमन्ना-नवाझच्या चित्रपटात अमृता फडणवीसांचं पार्श्वगायन

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा