अक्षय कुमारच्या आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा

अक्षय कुमार आणि करण जोहर दोघे मिळून या सिनेमाची करणार आहेत. 2019 मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे.

अक्षय कुमारच्या आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा

मुंबई : यावर्षी ‘जॉली एलएलबी 2’ आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या सिनेमांच्या यशानंतर अभिनेता अक्षय कुमार आणखी एका नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. सारगढी युद्धावर आधारित असणाऱ्या या सिनेमाचं नाव 'केसरी' असणार आहे.

या सिनेमाची निर्मिती अक्षय कुमार आणि करण जोहर दोघे मिळून करणार आहेत. 2019 मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने या सिनेमाविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/917744311848132608

या सिनेमाच्या निर्मितीमध्ये अभिनेता सलमान खानचाही सहभाग असणार होता. मात्र सलमानने यातून माघार घेतली आहे. यावर्षी जानेवारीतच सलमानने याबाबत स्वतः माहिती दिली होती.

https://twitter.com/BeingSalmanKhan/status/815958599872761856

अक्षय कुमार सध्या गोल्ड या त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय 2.0 या रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाच्या निर्मितीचं कामही सध्या सुरु आहे.

अक्षय कुमार 2018 मध्ये 2.0, गोल्ड, पद्मन, फाईव्ह, मोगुल आणि क्रॅक या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV