50 व्या जन्मदिनानिमित्त अक्षय कुमारकडून नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर

गोल्ड सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे 15 ऑगस्ट 2018 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचं पोस्टर शेअर करण्यापूर्वी अक्षय कुमारने जन्मदिनानिमित्त अनेक ट्वीटही केले.

50 व्या जन्मदिनानिमित्त अक्षय कुमारकडून नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार 50 वर्षांचा झाला आहे. सर्व प्रकारच्या भूमिकांना न्याय देणाऱ्या या अभिनेत्याने जन्मदिनाच्या निमित्ताने नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे.

अक्षय कुमारने 'गोल्ड' या त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं. हा सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे 15 ऑगस्ट 2018 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचं पोस्टर शेअर करण्यापूर्वी अक्षय कुमारने जन्मदिनानिमित्त अनेक ट्वीटही केले.

https://twitter.com/akshaykumar/status/906177927305469952

गोल्ड सिनेमातून अक्षय कुमार पहिल्यांदाच एक्सेल एंटरटेनमेंटचे रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्यासोबत काम करत आहे. तर सिनेमाचं दिग्दर्शन रिमा कागती करत आहेत. या सिनेमातून अभिनेत्री मौनी रॉय बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

हा सिनेमा भारताच्या स्वातंत्र्यानंतर लंडनमध्ये खेळण्यात आलेल्या चौदाव्या ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवलेल्या पहिल्या पदकावर आधारित आहे. 2018 मध्ये स्वातंत्र्या दिनाच्या दिवशी हा सिनेमा रिलीज होईल.

दरम्यान अक्षय कुमारच्या टॉयलेट एक प्रेम कथा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या सिनेमाने चार आठवड्यात 130 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. अक्षय कुमारचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.

अक्षय कुमारच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत 'रावडी राठोड' या सिनेमाचा क्रमांक लागतो. या सिनेमाने 131 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. त्या पाठोपाठ आता 'टॉयलेट एक प्रेम कथा' सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV