अक्षयकुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर रिलीज

'अभी तक इंडिया चूप था, अब हम बोलेगा और दुनिया सुनेगा' अशी गोल्ड सिनेमाची टॅगलाईन आहे.

अक्षयकुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर रिलीज

मुंबई : अभिनेता अक्षयकुमारच्या बहुप्रतीक्षित 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. 1948 मध्ये स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या हॉकीपटूची भूमिका अक्षयने साकारली आहे.

'हम एक पागल बंगाली है, हम हॉकी से प्यार करता है' या संवादाने टीझर सुरु होतो. 1946 चा काळ सिनेमामध्ये दाखवण्यात आला आहे. ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली भारताने तीन गोल्ड जिंकले, मात्र तिरंग्यासाठी पहिला गोल्ड जिंकण्यासाठी अक्षयकुमारची व्यक्तिरेखा इतरांना प्रोत्साहन देते.

'अभी तक इंडिया चूप था, अब हम बोलेगा और दुनिया सुनेगा' अशी गोल्ड सिनेमाची टॅगलाईन आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या 'एक्सेल एंटरटेनमेंट'ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रिमा काग्तीने सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा हाती घेतली आहे.

गोल्ड चित्रपटातून 'नागीन' फेम टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. मौनी अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याशिवाय अमित साध, कुणाल कपूर, फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहेत. डिसेंबर महिन्यात गोल्डचं शूटिंग पूर्ण झालं.

अक्षयची मुख्य भूमिका असलेला पॅडमॅन येत्या 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय रजनीकांतची भूमिका असलेला '2.0' ही प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.

पाहा टीझर :


सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Akshay Kumar’s Gold Teaser : Story Of India’s First Olympic Medal latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV