VIDEO : मैत्रिणीच्या लग्नात 'हवा... हवा...'वर आलिया थिरकली

आपल्या मैत्रिणीला 'मोह मोह के धागे' या गाण्यावर नाचताना पाहून आलिया इमोशनल झालेली पाहायला मिळाली.

VIDEO : मैत्रिणीच्या लग्नात 'हवा... हवा...'वर आलिया थिरकली

जोधपूर : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिची खास मैत्रीण कृपा मेहताच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसत आहे. या लग्नसोहळ्यामधील आलिया भटच्या डान्सचे व्हिडीओ तिच्या फॅन क्लब अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

मैत्रिणीच्या लग्नासाठी आलिया जोधपूरमध्ये आहे. संगीताच्या वेळी आलिया आणि तिच्या मैत्रिणी अर्जुन कपूरच्या 'हवा-हवा' गाण्यावर थिरकताना दिसल्या.
एका व्हिडीओत आपल्या मैत्रिणीला 'मोह मोह के धागे' या गाण्यावर नाचताना पाहून आलिया इमोशनल झालेली पाहायला मिळाली. इतकंच नाही तर होस्टने नवरी मुलीच्या मैत्रिणींना बॉण्डिंगबद्दल विचारालं तेव्हा आलियाला रडू कोसळलं.
सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV