एका आठवड्यातच 'बद्रीनाथ की दुल्हनिया' 100 कोटी क्लबमध्ये!

एका आठवड्यातच 'बद्रीनाथ की दुल्हनिया' 100 कोटी क्लबमध्ये!

मुंबई : आलिया भट आणि वरुण धवन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे प्रदर्शनाच्या एक आठवड्यातच 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. सिनेमाने जगभरात 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सिनेमाने गुरुवारी देशभरात 5.06 रुपयांचा गल्ला जमवला. यासोबतच चित्रपटाची देशातील कमाई 70 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सिनेमा बनवल्यापासून त्याचं प्रमोशन करण्यापर्यंत सुमारे 50 कोटी रुपये खर्च केले होते.

'बद्रीनाथ की दुल्हनिया'ने पहिल्या दिवशी म्हणजेच 10 मार्चला 12.25 कोटी रुपये कमावले होते. वीकेण्ड असल्याने शनिवारी चित्रपटाने 14.75 कोटीं कमावले. तर 12 मार्चला सिनेमाने आतापर्यंतची सर्वाधिक 16.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सोमवारी 12.08 कोटी, मंगळवारी 7.52 कोटी, बुधवारी 5.95 कोटी तर गुरुवारी सिनेमाने 5.06 कोटी कमावले. यामुळे चित्रपटाची देशातील एकूण कमाई 73.66 कोटी झाली आहे.

आलिया आणि वरुण हे तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. 'स्टूडंट ऑफ द ईयर' सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' मध्ये ते एकत्र दिसले होते.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV