सगळ्यांना भरावा लागणार GST... अमेय वाघचा उखाणा

सगळ्यांना भरावा लागणार GST... अमेय वाघचा उखाणा

मुंबई : वेब सीरिज, नाटक, सिनेमा आणि मालिका अशी चौफेर मुशाफिरी करणारा अभिनेता अमेय वाघ रविवारी विवाहबंधनात अडकला. त्यानंतर अमेयने फेसबुकवरुन इंटरेस्टिंग उखाणा घेतला आहे.

चला नाव घेतो-
देशात बदल घडतोय.. सगळ्यांना भरावा लागणार GST
साजिरी मुळे माझ्या संसाराचा मुरांबा झालाय आणखीनच tastyहा उखाणा अमेयने मंगळवारी दुपारी फेसबुकवर पोस्ट केला. तासाभराच्या आतच साडेचार हजारांहून जास्त लाईक्स आणि शेअर्स आले आहेत. कमेंट्समधूनही अमेयच्या उखाण्याचं कौतुक आणि लग्नाच्या शुभेच्छांचा पाऊस पडला आहे.

पुण्याच्या श्रुतिमंगल कार्यालयात रविवारी अमेयचं लग्न त्याची बालमैत्रीण साजिरी देशपांडे हिच्याशी झालं. लग्नाच्या आधीपासूनच अमेयने #वाघाचीझालीशेळी हा हॅशटॅग ट्रेण्ड केला होता. लग्नात साजिरीने सुंदर नववारी साडी नेसली होती, तर अमेयने नक्षीदार शेरवानी घातला होता. अमेयच्या लग्नाला चित्रपटसृष्टीतील अनेक तारेतारकांनी हजेरी लावली होती.

नुकताच अमेयचा 'मुरांबा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. झी मराठीवर दिल दोस्ती दोबारा या मालिकेतही तो झळकला होता. रंगभूमीवर अमर फोटो स्टुडिओ हे नाटकही गाजत आहे. तर भाडिप, बॉयगिरी या वेबसीरिजमध्येही अमेय चमकत आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV