नियमित तपासणीनंतर अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

महानायक अमिताभ बच्चन यांना काल (शुक्रवार) अचानक मानेचा आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, रेग्युलर चेकअपनंतर अमिताभ यांना काल रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला.

नियमित तपासणीनंतर अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना काल (शुक्रवार) अचानक मानेचा आणि पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, रेग्युलर चेकअपनंतर अमिताभ यांना काल रात्रीच डिस्चार्ज देण्यात आला.

गुरुवारी रात्री ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या सिनेमाचं शुटिंग गोरेगाव फिल्मसिटीत सुरु होतं. ते उशिरापर्यंत चालू असल्याने त्याचाच त्रास जाणवत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आवश्यक त्या वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अमिताभ बच्चन यांना 2012 मध्येही शस्त्रक्रियेसाठी 12 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बच्चन यांना यकृतासंबंधीचा त्रास आहे. त्याचबरोबर 2005 मध्येही त्यांच्या पोटात प्रचंड दुखत असल्याने त्यांच्यावर आतड्यांसंबंधी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाचं शुटिंग सध्या सुरु आहे. 7 नोव्हेंबर 2018 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: amitabh bachchan admitted to lilavati hospital
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV