अपनों का पता तो चला, बिग बींचं मध्यरात्री इमोशनल ट्वीट

जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये सध्या अमिताभ बच्चन आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

अपनों का पता तो चला, बिग बींचं मध्यरात्री इमोशनल ट्वीट

मुंबई : 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमाची शूटिंग सुरु असताना अचानक महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली होती. उपचारानंतर त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. त्यानंतर मध्यरात्री अमिताभ बच्चन यांनी अत्यंत भावनिक ट्वीट केलं.

"कुछ कष्ट बढ़ा चिकिस्तक को चिकिस्ता के लिए बुलाना पड़ा; इलाज प्रबल, स्वस्थ हुए नवल, चलो इसी बहाने अपनों का पता तो चला", असे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

राजस्थानमधील जोधपूरमध्ये 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमाची शूटिंग सुरु होती. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर मुंबईतून 10 डॉक्टरांची टीम चार्टर विमानातून तातडीने जोधपूरला रवाना झाली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार सुरु केले.जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये सध्या अमिताभ बच्चन आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम असून ते आज शूटिंगसाठी सेटवर परतणार आहेत. शिवाय, आज अभिनेता आमिर खानचा देखील वाढदिवस आहे, सेटवरच वाढदिवस सेलिब्रेट करण्यात येणार आहे.

संबंधित बातमी : महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Amitabh Bachchan emotional tweet after recover from illness
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV