महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम

राजस्थानमधील जोधपूरमध्ये अमिताभ बच्चन यांची भूमिका असलेल्या ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाची शूटिंग सुरु आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम

जोधपूर : हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत आज सकाळी बिघाड झाला होता. मात्र उपचारानंतर आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं समजतं आहे. राजस्थानमधील जोधपूरमध्ये ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सिनेमाच्या शूटिंगवेळी बिग बींची प्रकृती बिघडली होती.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम असून ते पुन्हा एकदा शुटींगसाठी सेटवर परतणार असल्याचंही समजतं आहे. तसंच उद्या (बुधवार) अभिनेता आमिर खानचा देखील वाढदिवस असल्याने तोही सेटवरच सेलिब्रेट करण्यात येणार आहे.

जोधपूरमधील अजित महल या हॉटेलमध्ये सध्या अमिताभ बच्चन आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईतून चार्टर विमानाने 10 डॉक्टर जोधपूरच्या रवाना झाले होते. डॉक्टरांच्या पथकाने अमिताभ बच्चन यांची तपासणी केल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं जाहीर केलं.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Amitabh Bachchan taken ill during shooting of ‘Thugs of Hindostan’
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV