18 वर्षांनंतर माधुरी-अनिलची जोडी सिनेमात एकत्र

2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुकार' चित्रपटात अनिल आणि माधुरी अखेरचे एकत्र दिसले होते

18 वर्षांनंतर माधुरी-अनिलची जोडी सिनेमात एकत्र

मुंबई : 80 च्या दशकाची अखेर आणि 90 च्या दशकामध्ये धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या जोडीने धुमाकूळ घातला होता. मात्र गेल्या काही वर्षांत या दोघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली नव्हती. तब्बल 18 वर्षांनी अनिल आणि माधुरीला सिनेमात एकत्र पाहता येणार आहे.

2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुकार' चित्रपटात अनिल आणि माधुरी अखेरचे एकत्र दिसले होते, तर 'लज्जा'मध्ये दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली नव्हती. आता इंद्र कुमार यांच्या 'टोटल धमाल' या सिनेमात तब्बल 18 वर्षांनी दोघं एकत्र झळकणार आहेत. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात सिनेमाचं शूटिंग सुरु होणार आहे. हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप निश्चित नाही.

इंद्र कुमार यांचा हा चित्रपट पूर्णपणे कॉमेडी असेल. त्यामुळे 'धक धक' सारखी सेन्शुअस गाणी चाहत्यांना पाहता येणार नाही. किंवा दोघांमधली रोमँटिक केमिस्ट्रीही पडद्यावर दिसणार नाही. मात्र दोघांना एकत्र पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळेल.

अनिल-माधुरीचे गाजलेले चित्रपट

हिफाझत (1987)
तेजाब (1988)
परिंदा (1989)
राम लखन (1989)
किशन कन्हैया (1990)
जमाई राजा (1990)
जीवन एक संघर्ष (1990)
प्रतिकार (1991)
खेल (1992)
धारावी (1992)
बेटा (1992)
जिंदगी एक जुआ (1992)
दिल तेरा आशिक (1993)
राजकुमार (1996)
पुकार (2000)
लज्जा (2001)

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Anil Kapoor and Madhuri Dixit to share screen after 18 years latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV