हिंदी 'सारेगमप लिटील चॅम्प'मध्ये मराठी झेंडा, अंजली गायकवाड विजेती

नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अली, हे तिघे मुख्य परीक्षक, तर 30 सदस्यांची ज्युरी जज या कार्यक्रमात होते. तर आदित्य नारायणने सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली.

By: | Last Updated: > Monday, 30 October 2017 9:39 AM
Anjali Gaikwad winner of SRGMP little Champ 2017 latest updates

जयपूर : ‘सारेगमप लिटील चॅम्प’ या हिंदी गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये मराठी झेंडा फडकला आहे. अंतिम फेरीत अहमदनगरमधील अंजली गायकवाड विजयी झाली. अंजली गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्टाचार्य या दोघांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस विभागून देण्यात आलं.

जयपूरमध्ये ‘सारेगमप लिटील चॅम्प’च्या 2017 च्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडला. कोण विजेता ठरणार, याची उत्सुकता शिगेल पोहोचली असतान, परीक्षकांनी थोडा सुखद धक्का दिला. प्रथम क्रमांकासाठी एक नव्हे, तर दोघांची नावं घोषित करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राली अहमदनगर जिल्ह्यातील अंजली गायकवाडचाही समावेश आहे.

नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि जावेद अली, हे तिघे मुख्य परीक्षक, तर 30 सदस्यांची ज्युरी जज या कार्यक्रमात होते. तर आदित्य नारायणने सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली.

गेल्या आठ महिन्यांपासून ‘सारेगमप लिटील चॅम्प’ बननण्यासाठी स्पर्धा सुरु होती. अंतिम फेरीत अंजली गायकवाड, श्रेयन भट्टाचार्य, शन्मुखप्रिया, धृन टिक्कू, वैष्णव गिरीश आणि सोनाक्षी कर या सहा जणांची निवड झाली होती. त्यानंतर जयपूरमध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत अंजली गायकवाड आणि श्रेयन भट्टाचार्य यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला.

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Anjali Gaikwad winner of SRGMP little Champ 2017 latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात, पहिल्या शॉटचे फोटो समोर
‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात, पहिल्या शॉटचे फोटो...

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान

रणबीरच्या अरेंज मॅरेजसाठी आई नीतू कपूरचं वधूसंशोधन
रणबीरच्या अरेंज मॅरेजसाठी आई नीतू कपूरचं वधूसंशोधन

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर बॉलिवूडमधल्या एखाद्या

'नकाब' फेम अभिनेत्री उर्वशी शर्मा दुसऱ्यांदा आई
'नकाब' फेम अभिनेत्री उर्वशी शर्मा दुसऱ्यांदा आई

मुंबई : ‘नकाब’फेम बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी शर्मा दुसऱ्यांदा आई

‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात
‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू संसदीय बोर्डाच्या कोर्टात

नवी दिल्ली : ‘पद्मावती’ सिनेमाच्या वादाचा चेंडू आता संसदीय

तीन पुरुष रिक्षात असताना गँगरेप पीडितेने बसायचंच का?: किरण खेर
तीन पुरुष रिक्षात असताना गँगरेप पीडितेने बसायचंच का?: किरण खेर

चंदिगढ : रिक्षामध्ये आधीच तीन पुरुष बसले होते, तर ‘गँगरेप पीडित’

म्हणून 'साहो'त प्रभाससोबत काम करण्यास आलियाचा नकार
म्हणून 'साहो'त प्रभाससोबत काम करण्यास आलियाचा नकार

मुंबई : प्रभासच्या आगामी ‘साहो’ चित्रपटात श्रद्धा कपूर झळकणार

'टारझन द वंडर कार'फेम वत्सल शेठ-इशिता दत्ता विवाहबंधनात
'टारझन द वंडर कार'फेम वत्सल शेठ-इशिता दत्ता विवाहबंधनात

मुंबई : ‘टारझन द वंडर कार’ फेम अभिनेता वत्सल शेठ विवाहबंधनात

'इफ्फी'त ‘120 बिट्स पर मिनिट’ला गोल्डन पिकॉक पुरस्कार
'इफ्फी'त ‘120 बिट्स पर मिनिट’ला गोल्डन पिकॉक पुरस्कार

पणजी : मोरोक्कोत जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पिलो

'पद्मावती'चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
'पद्मावती'चं प्रदर्शन रोखण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

नवी दिल्ली : एखादा सिनेमाला सेन्सॉर बोर्डाकडून मंजुरी

इफ्फीच्या शेवटच्या दिवशीही 'एस. दुर्गा'चा शो नाही!
इफ्फीच्या शेवटच्या दिवशीही 'एस. दुर्गा'चा शो नाही!

पणजी : गोव्यात सुरु असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात