'हे' माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नाहीत, तर...

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनुपम खेर यांचा हा फोटो आहे.

'हे' माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नाहीत, तर...

मुंबई : फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा... निळा फेटा, पांढराशुभ्र चुडीदार-कुर्ता आणि जॅकेट अशी वेशभूषा पाहून 'हे' माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आहेत, अशी अटकळ तुम्ही बांधली असेल. किंबहुना तुम्ही आपल्या उत्तरावर ठाम असाल. मात्र तुम्ही चुकताय.. हे मनमोहन सिंग नसून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आहेत.

'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटात मनमोहन सिंग यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनुपम खेर यांचा हा फोटो आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान खेर यांचा व्हायरल झालेला हुबेहूब लूक पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. काही चाहत्यांचा तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, अखेर खुद्द अनुपम खेर यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करुन 'हे' आपणच असल्याचं सांगितलं.एका सीनची तालीम करताना सेटवरील कोणीतरी शूट केलं आणि सोशल मीडियावर ती क्लीप व्हायरल केली. यूकेमध्ये सिनेमाचं चित्रीकरण सुरु असून सेटवर एका इमारतीतून अनुपम खेर बाहेर पडतानाचं हे दृश्य आहे.
मनमोहन सिंग यांचे तत्कालीन माध्यम सल्लागार संजय बारु यांनी लिहिलेल्या 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या पुस्तकावर त्याच नावाने सिनेमा येत आहे. नवोदित दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

जर्मन अभिनेत्री सुझैन बर्नाट यामध्ये सोनिया गांधींच्या, नवनी परिहार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षय खन्ना माध्यम सल्लागार संजय बारु यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Anupam Kher looks like Manmohan Singh in The Accidental Prime Minister latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV