21 वर्ष लहान युवतीशी अनुराग कश्यपचं तिसरं लग्न?

21 वर्ष लहान युवतीशी अनुराग कश्यपचं तिसरं लग्न?

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप याचे चित्रपट जसे पठडीबाह्य असतात, तसंच काहीसं त्याचं आयुष्यही आहे. देवडी, नो स्मोकिंग, गँग्ज ऑफ वासेपूर, रामन राघव 2.0 यासारख्या चित्रपटातून आयुष्याची काळी बाजू दाखवणाऱ्या अनुरागचं लव्ह लाईफ मात्र रंगतदार आहे. अनुराग त्याच्या वयापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीशी लवकरच लगीनगाठ बांधणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.Love ❤️


A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on


अनुराग कश्यप शुभ्रा शेट्टी नावाच्या तरुणासोबत डेटिंग करत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून म्हटलं जायचं. मात्र आता त्याचे इन्स्टाग्राम पोस्ट पाहता दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं जवळपास पक्कं मानलं जात आहे.

अनुराग कश्यप 2003 मध्ये आरती बजाजसोबत लग्नाच्या बेडीत अडकला होता. सहा वर्षांच्या संसारानंतर 2009 मध्ये दोघांनी काडीमोड घेतला. त्यानंतर अनुरागचं कल्की कोएचलीनसोबत डेटिंग सुरु झालं. 2011 अनुराग-कल्की विवाहबंधनात अडकले. देवडी या चित्रपटातून कल्कीला त्याने बॉलिवूडमध्ये लाँच केलं. कल्की बी टाऊनमध्ये काहीशी स्थिरावलीही. मात्र चार वर्षांच्या सहजीवनानंतर दोघांनी 2015 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

We are killing it #Rupalsid

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on
2016 च्या अखेरीस शुभ्रा शेट्टी अनुरागच्या आयुष्यात आल्याचं सांगितलं जातं. दोघं लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरु झाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनुराग कश्यप 44 वर्षांचा आहे, तर शुभ्रा अवघी 23 वर्षांची. म्हणजेच दोघांच्या वयात तब्बल 21 वर्षांचं अंतर आहे. दोघांनी लगीनगाठ बांधल्यास अनुरागचं हे तिसरं लग्न असेल.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV