सट्टेबाजीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मेहुण्याला अटक

क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मेहुण्याला अटक केली आहे. अजित गील असं याचं नाव आहे.

सट्टेबाजीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मेहुण्याला अटक

मुंबई : क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मेहुण्याला अटक केली आहे. अजित गील असं याचं नाव असून, न्यायालयाने त्याला 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमित गील ऑगस्ट महिन्यात भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान सट्टा लावत होत. या प्रकरणी गुन्हे शाखेनं अंधेरीतून तीन जणांनाही अटक केली आहे. तसेच सट्टेबाजीप्रकरणात सहभागी इतरांचा शोध सध्या सुरु आहे.

न्यायालयासमोर सादर केल्यानंतर 3 ऑक्टोबरपर्यंत त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. मात्र, पत्रकारांनी अमितला अर्जुनबद्दल विचारलं असता, त्यानं त्याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं वक्तव्य केलं.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून सट्टेबाजीविरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार 24 ऑगस्ट रोजीच्या भारत-श्रीलंका क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्यात येत असताना, मुंबई पोलिसांनी अमितला अटक केली.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV