कुख्यात डॉन अरुण गवळीच्या जीवनावरील हिंदी सिनेमा 'डॅडी'चा ट्रेलर रिलीज

By: | Last Updated: > Wednesday, 14 June 2017 8:25 PM
Arjun Rampals upcoming movie Daddy Official Trailer release

फोटो सौजन्य : यूट्यूब

मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळीच्या जीवनावरील ‘डॅडी’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल डॉन अरुण गवळीची भूमिका साकारत आहे. या सिनेमासाठी अर्जुनने चांगलीच मेहनत घेतल्याचे सिनेमाच्या ट्रेलरमधून दिसतंय.

अरुण गवळीचा ‘डॉन’ ते राजकीय नेत्यापर्यंतचा प्रवास या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. सिनेमातून अरुण गवळीची इमेज सुधारणाचा प्रयत्न होणार नसल्याचं या आधीच अर्जुनने स्पष्ट केलं होतं. या सिनेमाची सुरुवात 1970 सालातील ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिन्सने होते.

दरम्यान, या सिनेमातील प्रमुख भूमिका साकारण्यासह अर्जुन रामपाल या सिनेमाची निर्मितीही करत आहे. तर या सिनेमाचे दिग्दर्शन असीम आहलुवालिया यांनी केलं आहे. या सिनेमाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच अर्जुनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट केलं होतं.

सिनेमात अर्जुनसह फरहान अख्तर आणि ऐश्वर्या राजेश मुख्य भूमिकेत आहेत. ऐश्वर्याने या सिनेमात अर्जुनच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. याशिवाय काही मराठी कलाकारही या सिनेमातही प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबर 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वी अरुण गवळीच्या जीवनावरील दगडी चाळ हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अभिनेता मकरंद देशपांडे यांनी अरुण गवळीची भूमिका साकारली होती.

सिनेमाचा ट्रेलर पाहा

Movies News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Arjun Rampals upcoming movie Daddy Official Trailer release
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर
कारवर बसून टवाळी करणाऱ्यांना एलियानाचं सडेतोड उत्तर

मुंबई : आपल्या समाजातील तरुणी, मग त्या कोणत्याही आर्थिक, सामाजिक

शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज
शिधापत्रिकेतून नाव हटवण्यासाठी नागराज मंजुळेंचा अर्ज

सोलापूर : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अन्न सुरक्षा योजनेची गरज

मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी
मला सेन्सॉर बोर्डावरुन हटवण्यात आलं कारण... : निहलानी

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन

सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर
सनी लियोनीचा कारवां, एका झलकसाठी आख्खं केरळ रस्त्यावर

कोची : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीची क्रेझ किती आहे याचं ताजं

नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?
नाकाच्या सर्जरीनंतर जान्हवी कपूरवर पुन्हा शस्त्रक्रिया?

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर नुकतीच

‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र
‘शहेनशाह’ आणि ‘इंद्रा’ पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीचा ‘शहेनशाह’ अर्थात महानायक अमिताभ बच्चन

VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज
VIDEO : 'न्यूटन' सिनेमाचा हटके टीजर रिलीज

मुंबई : अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा ‘न्यूटन’चा टीझर

आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट
आकडा 100 कोटींच्या पार, 'टॉयलेट...' बॉक्स ऑफिसवर सुसाट

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर

'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?
'साहो'साठी प्रभासला 30 कोटी, तर श्रद्धा कपूरला किती?

मुंबई : ‘बाहुबली 2’ च्या घवघवीत यशानंतर आता प्रभासचा प्रत्येक

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात