अमरनाथ हल्ल्याचं दुःख आणि तीव्र संताप : अक्षय कुमार

अमरनाथ हल्ल्याचं दुःख आणि तीव्र संताप : अक्षय कुमार

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 12 भाविक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला.

अभिनेता अक्षय कुमारने या हल्ल्याविरोधात तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. अमरनाथ यात्रेतील निर्दोष भाविकांवरील हल्ला निंदणीय आहे. याचा रागही आलाय आणि दुःखही आहे, असं ट्वीट अक्षय कुमारने केलं आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/884450706824081412

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या अमरनाथ यात्रा सुरु असून या यात्रेसाठी देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल होतात. या यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव दल अर्थात सीआरपीएफकडे असते. मात्र  यावर्षी दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडे यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

हल्ल्यानंतर गृहमंत्रालयाची तातडीची बैठक

अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 भाविक जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शिवाय, गृहमंत्रालयाची टीमही आज अनंतनागला जाऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करणार आहे.

अमरनाथ यात्रेतील भाविकांवर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये कांवड यात्रेचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

चोख बंदोबस्तात दुसरा गट अमरनाथ यात्रेसाठी रवाना

अमरनाथ यात्रेतल्या भाविकांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर चोख सुरक्षेत भाविकांचा दुसरा गट रवाना झाला आहे. भाविकांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतरही भाविकांचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. काहीही झालं तरी भोलेनाथाचं दर्शन घेणार असल्याचं भाविकांनी म्हटलं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV