VIDEO : अजय-इम्रानच्या अॅक्शनपॅक्ड 'बादशाहो'चा ट्रेलर

ये जो समय है ना, ये सबकी लेता है, समय समय पर, सही समय पर, सही तरह से लेता है... मौत जब सरपे होती हे, जिंदगी की किमत पता चलती है... यासारखे दाद मिळवणारे डायलॉग्ज सिनेमात आहेत.

VIDEO : अजय-इम्रानच्या अॅक्शनपॅक्ड 'बादशाहो'चा ट्रेलर

मुंबई : अजय देवगन, इम्रान हाश्मी यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित अॅक्शन-थ्रिलर 'बादशाहो' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हायव्होल्टेज ड्रामा आणि अॅक्शनपॅक्ड सीन्ससोबतच जबरदस्त डायलॉग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

अजय देवगन, इम्रान हाश्मी, इशा गुप्ता, एलियाना डिक्रुझ, विद्युत जमवाल, संजय मिश्रा यांच्या बादशाहोमध्ये मुख्य भूमिका आहेत. वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, द डर्टी पिक्चर, कच्चे धागे सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक मिलन लुथरिया यांच्या खाद्यावर 'बादशाहो'ची जबाबदारी आहे. 1 सप्टेंबर 2017 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

ये जो समय है ना, ये सबकी लेता है, समय समय पर, सही समय पर, सही तरह से लेता है... मौत जब सरपे होती हे, जिंदगी की किमत पता चलती है... यासारखे दाद मिळवणारे डायलॉग्ज सिनेमात आहेत.

सव्वा दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सर्वांच्या व्यक्तिरेखांची ओळख परेड होते. 1970 मधील आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडते. अजयने भवानी, इम्रानने दलिया, एलियानाने गीतांजली, इशाने संजना, तर विद्युतने सेहेर ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सनी लिओन 'पिया मोरे' या गाण्यात झळकणार आहे.

1999 मध्ये कच्चे धागे चित्रपटाच्या शूटिंग वेळीच या सिनेमाची कथा डोक्यात रुंजी घालत होती, मात्र त्यानंतर इतर प्रोजेक्टसमध्ये व्यस्त झाल्यामुळे ही संकल्पना मागे पडल्याचं लुथरियांनी सांगितलं.

पाहा ट्रेलर :

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV