बाहुबली 2 ची पाकिस्तानातही बंपर कमाई

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 18 May 2017 12:41 PM
बाहुबली 2 ची पाकिस्तानातही बंपर कमाई

मुंबई : एस एस राजमौली यांच्या ‘बाहुबली 2’ अर्थात ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवनव्या विक्रमांची नोंद केली आहे. जगभरातील कमाईने 1475 कोटींचा आकडा पार केला असताना पाकिस्तानातही बाहुबली 2 ला बंपर ओपनिंग मिळालं आहे. पहिल्या वीकेंडलाच पाकमध्ये साडेचार कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

बाहुबली 2 हा पाकिस्तानात रिलीज झालेला पहिला डब केलेला प्रादेशिक चित्रपट आहे. पाकिस्तानात बाहुबली 2 हा 100 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर झळकला आहे. चित्रपटाच्या कथानकात हिंदू पुराण आणि परंपरांवर भर असला, तरी पाकमधील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं पाकिस्तानचे सिने वितरक अमजद रशिद यांनी म्हटलं आहे.

विशेष म्हणजे पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाने एकही कट न सुचवता, ‘यू’ प्रमाणपत्रासह बाहुबली 2 हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित झाला आहे. पाकिस्तानात पहिल्या आठवड्याभरात सहा कोटींची कमाई करण्याचा अंदाज आहे.

आतापर्यंत अनेक बॉलिवूडपटांवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. आमीर खानचा दंगलही पाकमध्ये प्रदर्शित होणार होता, मात्र आमीरनेच त्यास मनाई केली.

बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला होता. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.

संबंधित बातम्या

मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन

बाहुबली टीमचं झाडे लावा अभियान

कटप्पा-बाहुबलीचं कोडं ‘या’ पठ्ठ्याने दोन वर्षांपूर्वीच सोडवलं होतं

‘बाहुबली’तील देवसेनेचं विदारक रुप चितारणारे मराठी हात

बाहुबली 2 ची घोडदौड, 10 दिवसात 1 हजार कोटींचा पल्ला ओलांडला!

हिरे कारखान्यातील कामगार ते ‘बाहुबली’चा साऊंड डिझायनर

बाहुबलीमध्ये शिवगामीने वाचवलेलं ‘ते’ बाळ कोण?

‘बाहुबली 2’साठी प्रभासने 10 कोटींची जाहिरात नाकारली!

बाहुबली 2 ने याड लावलं! पहिल्या आठवड्यात विक्रमी कमाई

‘बाहुबली 2’ दरम्यान 132 जाहिराती, थिएटरवर कारवाईची मागणी

म्हणून बाहुबली इतकाच भल्लाल मनावर छाप पाडतो..

बाहुबलीला मरण्यासाठी 25 कोटी रुपये तर कटप्पाला केवळ….!

‘बाहुबली 2’ ची चौथ्या दिवशीची कमाई किती?

सलमान-आमीरवर मात, शाहरुखचा विक्रम मोडण्यात प्रभास अपयशी

बाहुबली बनवणारे राजमौली कोण?

सर्व विक्रम मोडीत, ‘बाहुबली 2’ ची विकेंडला ऐतिहासिक कमाई

भल्लालदेवला फक्त एकाच डोळ्यानं पाहता येतं!

‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..

अंडरटेकरची भेट, ते मानधन, ‘बाहुबली’च्या 15 फॅक्ट्स !

‘बाहुबली 2’ पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? उत्तर मिळणार?

दुबईत ‘बाहुबली 2’ प्रदर्शित, कटप्पा-बाहुबलीचं उत्तर मिळालं?

‘बाहुबली 2’ मधील भल्लाल देवची जबरदस्त शरीरयष्टी!

‘बाहुबली 2’ चा 9 मिनिटांचा पार्ट लीक, एकाला अटक

पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’कडे प्रेक्षकांची सपशेल पाठ

कटप्पानं बाहुबलीला का मारलं? कटप्पा म्हणतो…

‘बाहुबली 2’ मधील दुहेरी भूमिकेसाठी अभिनेता प्रभासचं डाएट

रिलीजपूर्वी ‘बाहुबली 2’चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर रिलीज

First Published: Thursday, 18 May 2017 12:41 PM

Related Stories

महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड
महिलांविषयी आक्षेपार्ह ट्वीट, गायक अभिजीतचं ट्विटर हँडल सस्पेंड

मुंबई : वादग्रस्त ट्वीट्ससाठी विख्यात असलेला बॉलिवूडचा

'जेम्स बाँड' अभिनेते सर रॉजर मूर यांचं कर्करोगाने निधन
'जेम्स बाँड' अभिनेते सर रॉजर मूर यांचं कर्करोगाने निधन

झुरिच, स्वित्झर्लंड : जेम्स बाँड साकारणाऱ्या कलाकारांपैकी अनेक

मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन
मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने ट्विटरवर चाहत्यांकडून मदत

दगडफेक करणाऱ्यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा : परेश रावल
दगडफेक करणाऱ्यांऐवजी अरुंधती रॉय यांना जीपला बांधा : परेश रावल

मुंबई : आपल्या विनोदी आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे बॉलिवूड

सचिनच्या बायोपिकचं वायुदलासाठी स्पेशल स्क्रीनिंग
सचिनच्या बायोपिकचं वायुदलासाठी स्पेशल स्क्रीनिंग

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या ‘सचिन ए

रिव्ह्यू : हिंदी मीडियम
रिव्ह्यू : हिंदी मीडियम

इरफान असल्यावर त्या गोष्टीला तो एका वेगळ्या उंचीवर नेणार, अशी भावना

रिव्ह्यू : चि. व चि. सौ. कां.
रिव्ह्यू : चि. व चि. सौ. कां.

चि. व चि. सौ. कां. परेश मोकाशीचा हा प्रदर्शित होणारा तिसरा सिनेमा. पण

सचिन तेंडुलकर पंतप्रधान मोदींच्या भेटीला
सचिन तेंडुलकर पंतप्रधान मोदींच्या भेटीला

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरने राजधानी नवी

अकबर आणि अँथनी पुन्हा एकत्र, मात्र बाप-लेकाच्या भूमिकेत!
अकबर आणि अँथनी पुन्हा एकत्र, मात्र बाप-लेकाच्या भूमिकेत!

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर ही जोडी

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन

मुंबई: कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी