रिलीजपूर्वी 'बाहुबली 2'चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

रिलीजपूर्वी 'बाहुबली 2'चा विक्रम, सर्वाधिक पाहिलेला ट्रेलर

मुंबई : दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन'चा ट्रेलर रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. पण पाच दिवसातच या सिनेमाच्या ट्रेलरने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

https://twitter.com/karanjohar/status/843693152695472131

प्रभास, राणा डग्गूबत्ती यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर जमा केला आहे. निर्माता करण जोहरने ट्वीट करुन दावा केला आहे की, आतापर्यंत सिनेमाच्या तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदीमधील ट्रेलरला 85 मिलियन म्हणजेच 8 कोटी 50 लाख व्हूव्ज मिळाले आहेत.करणने एक फोटो शेअर केला असून, ज्यात ‘बाहुबली 2’ ट्रेलरच्या विक्रमाची माहिती दिली आहे. शिवाय या सिनेमाच्या ट्रेलरचे व्ह्यूव्ज हे कोणत्याही भारतीय सिनेमाच्या ट्रेलरपेक्षा सर्वाधिक असल्याचा दावा करण जोहरने केला आहे.

https://twitter.com/karanjohar/status/842613483627732992

‘बाहुबली 2’ चा ट्रेलर हा रिलीजच्या 24 तासातच सर्वात जास्त वेळा पाहिलेला ट्रेलर आहे. करणच्या दाव्यानुसार, सुरुवातीच्या 24 तासात ‘बाहुबली 2’ च्या ट्रेलरला 5 कोटी व्ह्यूव्ज होते.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV