'बाहुबली 2' सोबत प्रभासच्या नव्या सिनेमाचा टीझर

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 20 April 2017 9:02 AM
'बाहुबली 2' सोबत प्रभासच्या नव्या सिनेमाचा टीझर

मुंबई : प्रेक्षकांना अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ या सिनेमाची मोठी उत्सुकता लागली आहे. या सिनेमासोबतच प्रेक्षकांना आणखी एक ट्रीट मिळणार आहे, ती म्हणजे प्रभासच्या पुढच्या अॅक्शन सिनेमाचा टीझर ‘बाहुबली 2’ सोबत रिलीज होणार आहे.

प्रभासच्या नव्या सिनेमाचं नाव अजून निश्चित झालेलं नाही. मात्र सिनेमाच्या बजेटचा मोठा हिस्सा अॅक्शन सीनच्या शूटिंगवर खर्च होईल, असं सिनेमाचे दिग्दर्शक सुजीत यांचं म्हणणं आहे.

सिनेमाचे निर्माते सिनेमातील अॅक्शन सीनवरच तब्बल 35 कोटी रुपये खर्च करणार आहेत. प्रेक्षकांना या सिनेमाचा टीझर ‘बाहुबली 2’ सोबत पाहायला मिळणार आहे. सिनेमाला शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाचं संगीत असेल.

राजामौली यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘बाहुबली 2’ सिनेमात पहिल्याच भागातील कलाकार म्हणजे प्रभास, राणा डुग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बाहुबलीच्या विश्वासू कटप्पानेच त्याचे प्राण का घेतले, या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळणार आहे.

2015 मध्ये बाहुबलीचा पहिला भाग ‘बाहुबली : द बिगिनिंग’ रिलीज झाला होता. त्यानंतर जवळपास पावणेदोन वर्षांनी दुसरा भाग येत आहे. 28 एप्रिल 2017 रोजी ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीझर आणि ट्रेलर रिलीज झालं आहे.

VIDEO : ‘बाहुबली 2’ चा ट्रेलर

First Published: Thursday, 20 April 2017 9:02 AM

Related Stories

झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी
झहीरची होणारी पत्नी सागरिकाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच ‘चक दे’ गर्ल सागरिका घाटगेशी

'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?
'बाहुबली 2' चं अॅडव्हान्स बुकिंग फुल्ल?

मुंबई: दोन वर्षापासून चर्चेत असलेला बाहुबली सिनेमा पुन्हा एकदा

...तर माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार
...तर माझा राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या : अक्षय कुमार

मुंबई : “मला 26 वर्षांनी पुरस्कार मिळालाय, जर तुम्हाला वाटत असेल तर

रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच पार्टनर!
रील लाईफमध्ये क्रिकेटरची प्रेयसी, रिअल लाईफमध्ये क्रिकेटरच...

मुंबई : क्रिकेटपटू झहीर खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार!
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र पुन्हा आजी-आजोबा होणार!

मुंबई : बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि बॉलिवूडचे सुपरमॅन

सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?
सुशांत-कृतीच्या 'राबता'चं राजामौलींच्या 'मगधीरा'शी कनेक्शन काय?

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आणि कृती सेननच्या ‘राबता’ सिनेमाचा

सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले
सोनमने 'भाग मिल्खा भाग'साठी केवळ 11 रुपये घेतले

मुंबई : ग्लॅमरस अंदाज आणि बिंधास्त स्वभावामुळे प्रसिद्ध असणारी

अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!
अजान वाद: अदनान सामी सोनू निगमच्या पाठिशी!

मुंबई: गायक सोनू निगमने मशिदीवरील लाऊडस्पीकरला विरोध केल्याने

अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली
अभिनेते एडी मर्फींना जिवंतपणीच ऋषी कपूरकडून श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर अनेक वेळा त्यांच्या ट्वीट्समुळे