VIDEO : 'बाहुबली 2' चा ट्रेलर रिलीज

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: Thursday, 16 March 2017 10:26 AM
VIDEO : 'बाहुबली 2' चा ट्रेलर रिलीज

मुंबई : बाहुबली फॅन्सना ज्या चित्रपटाची प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षा लागून राहिली आहे, त्या ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ अर्थात बाहुबली 2 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामुळे ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा?’ या गेल्या दीड वर्षांपासून प्रेक्षकांना छळणाऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.

राजामौली यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात पहिल्याच भागातील कलाकार म्हणजे प्रभास, राणा डुग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. बाहुबलीच्या विश्वासू कटप्पानेच त्याचे प्राण का घेतले, या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळणार आहे.

2015 मध्ये बाहुबलीचा पहिला भाग ‘बाहुबली : द बिगिनिंग’ रिलीज झाला होता. त्यानंतर जवळपास पावणेदोन वर्षांनी दुसरा भाग येत आहे. 28 एप्रिल 2017 रोजी ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीझर रिलीज झालं आहे.

बाहुबली 2 चा क्लायमॅक्स लीक होऊ नये म्हणून दिग्दर्शक राजामौलींनी चांगलीच खबरदारी घेतली आहे. एकाऐवजी तब्बल चार क्लायमॅक्स सीन शूट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अद्यापही कोणता क्लायमॅक्स ठेवायचा, याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे पडद्यावर कोणता क्लायमॅक्स दिसणार, हे सध्या कलाकारांनाही माहित नाही.

पाहा ट्रेलर

 

 

 

First Published: Thursday, 16 March 2017 10:08 AM

Related Stories

'पद्मावती'च्या सेटवर सांगलीच्या तीन युवकांचा मद्यप्राशन करुन धिंगाणा
'पद्मावती'च्या सेटवर सांगलीच्या तीन युवकांचा मद्यप्राशन करुन...

कोल्हापूर: दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या

श्रद्धा-अर्जुनच्या 'हाफ गर्लफ्रेण्ड'चा फर्स्ट लूक
श्रद्धा-अर्जुनच्या 'हाफ गर्लफ्रेण्ड'चा फर्स्ट लूक

मुंबई : श्रद्धा कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या ‘हाफ

ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट
ममता कुलकर्णीविरोधात अजामीनपात्र वॉरंट

ठाणे : अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी

दिल्लीतील तरुणीचा अक्षय कुमारला धोबीपछाड !
दिल्लीतील तरुणीचा अक्षय कुमारला धोबीपछाड !

नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार सध्या ‘नाम

विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला
विराटच्या समर्थनार्थ बिग बी पुन्हा मैदानात, ब्रॅड हॉजला टोला

मुंबई : दुखापतीमुळे आराम करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने धर्मशाला

रणबीर कपूरचं गौरी खानला इमोशनल पत्र
रणबीर कपूरचं गौरी खानला इमोशनल पत्र

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचं घर त्याची पत्नी गौरीने स्वत:च्या

राम गोपाल वर्माकडून योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधानांशी तुलना
राम गोपाल वर्माकडून योगी आदित्यनाथ यांची पंतप्रधानांशी तुलना

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा नेहमीच

ट्विंकल खन्नाचा योगी आदित्यनाथ यांना अजब सल्ला
ट्विंकल खन्नाचा योगी आदित्यनाथ यांना अजब सल्ला

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल

केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस
केकेआरचा मालक शाहरुख आणि गौरी खानला ‘ईडी’कडून नोटीस

मुबंई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांना