राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'बेगम जान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त 'बेगम जान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

नवी दिल्ली : अभिनेत्री विद्या बालनच्या अगामी सिनेमा 'बेगम जान'चे पोस्टर नुकतेच रिलीज झाले होते. रिलीज करण्यात आलेल्या या पोस्टरवर My Body, My House, My Country, My Rules… (माझं शरीर, माझं घर, माझा देश, माझे नियम) असं लिहण्यात आलं होतं. त्यामुळे अनेकांनी या सिनेमाची कथा एका वेशालयाशी संबंधित असल्याचा अंदाज बांधला होता. त्यांचा हा अंदाज खरा असून, या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालं.

या सिनेमात नासरुद्दीन शाह आणि विद्या बालन यांच्यासह रजत कपूर, गौहर खान, पल्लवी शारदा, इला अरुण, आशिष विद्यार्थी आणि चंकी पांडे मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचं ट्रेलर इतक जबरदस्त आहे की, ते पाहिल्यानंतरच या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानं का सन्मानित करण्यात आलं, हे समजेल.

C6R1Qz7U4AAzakp

या सिनेमाचं दिग्दर्शन पश्चिम बंगालचे प्रसिद्ध सिनेदग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी केलं असून, त्यांचा हा बॉलिवूडमधील पहिला सिनेमा आहे. 'बेगम जान' हा 2015 मध्ये प्रदर्शत झालेला बंगाली सिनेमा Rajkahini चा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाची कथा देशाला भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील आहे. या सिनेमात विद्या बालन एका वेश्यालय चालवणारी महिला दाखवली आहे.

begum-jaan1

विद्या बालनने या सिनेमाचं ट्रेलर ट्वीट करुन सिनेमा प्रदर्शनाची तारिख सांगितली आहे. विद्या बालन यांचा हा सिनेमा14 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

वास्तविक, हा सिनेमा जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपट निर्मात्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीख काही कारणांमुळे पुढे ढकलली.

सिनेमाचं ट्रेलर पाहा

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV