VIDEO : सपना चौधरी-अर्शी खानचे 'रष्के कमर'वर ठुमके

'लव्ह यू सपना चौधरी, तुझ्या कुटुंबासोबत छान संध्याकाळ गेली' असं कॅप्शन देत अर्शी खानने सपना चौधरीसोबतच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

VIDEO : सपना चौधरी-अर्शी खानचे 'रष्के कमर'वर ठुमके

नवी दिल्ली : हरियाणाची डान्सिंग सेन्सेशन सपना चौधरीच्या भावाच्या लग्नाला 'बिग बॉस'मधील अनेक स्पर्धकांनी हजेरी लावली होती. मॉडेल-अभिनेत्री आणि बिग बॉस स्पर्धक अर्शी खानने सपना चौधरीसोबत 'रश्के कमर' गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

'लव्ह यू सपना चौधरी, तुझ्या कुटुंबासोबत छान संध्याकाळ गेली' असं कॅप्शन देत अर्शीने हा डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोबतच लग्न समारंभातले काही फोटोसुद्धा अर्शीने पोस्ट केले आहेत.

बिग बॉसमध्ये अर्शी आणि सपना यांच्यातील 'तू-तू-मै-मै' प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय होते. दोघींमध्ये कडवं शत्रुत्व असल्याचं म्हटलं जात असताना दोघींमधली मैत्री आणि फनी व्हिडिओज पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातली. बंदगी आणि पुनिश वगळता कोणाशीच आपलं वैर नसल्याचं सपनाने सांगितलं, त्यामुळेच बिग बॉसच्या गेल्या पर्वातील बरेचसे स्पर्धक सपनाच्या भावाच्या लग्नाला गेले.Ummaaaaahhhhhh love you @itssapnachoudhary lovely night with your family 🤣😃😄


A post shared by Arshi khan (@arshikofficial) on
सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bigg Boss 11\'s Arshi Khan, Sapna Chaudhary dance on rashke qamar latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV