चित्रपटात जीएसटीवर भाष्य, भाजपची संवाद हटवण्याची मागणी

चित्रपटात जीएसटीवर भाष्य, भाजपची संवाद हटवण्याची मागणी

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता विजयची मुख्य भूमिका असलेल्या 'मर्सल' या तामिळ चित्रपटावर भाजपने आक्षेप घेतला आहे. चित्रपटात जीएसटीचा उल्लेख असल्यामुळे भाजपची धुसफूस होत आहे.

चित्रपटात जीएसटीबाबत केलेला उल्लेख चुकीचा असून संबंधित संवाद चित्रपटातून हटवण्याची मागणी भाजपने केली आहे. अर्थ राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात जीएसटीबाबत असलेला संवाद काढून टाकण्याची मागणी केली आहे.

सिनेमातून जीएसटीबाबत चुकीची माहिती प्रसारित होता कामा नये आणि चित्रपट माध्यमाचा वापर करुन अभिनेत्यांनी नागरिकांची दिशाभूल करु नये, असं राधाकृष्णन म्हणाले.

चित्रपटातून अभिनेता विजयचा मोदींवरील द्वेष दिसत आहे. विजयला अर्थशास्त्राची जाण नसल्याचं यातून दिसत असल्याचं वक्तव्य भाजप नेते एच राजा यांनी केलं आहे. चित्रपटातील दाव्यानुसार सिंगापूरमध्ये वैद्यकीय उपचार मोफत आहेत, मात्र तसं नसल्याचं राजा म्हणाले.

एक जुलैपासून देशभरात जीएसटी लागू करण्यात आला आहे.

रजनीकांतच्या 'कबाली'चे दिग्दर्शक रंजित 'मर्सल' चित्रपटाच्या बचावासाठी धावून आले आहेत. कट्स सुचवण्यामागे भाजपचं काय लॉजिक आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

Movies शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV