भाडं थकवल्याने मालकाने मल्लिकाला घराबाहेर काढलं!

मल्लिका आणि तिच्या बॉयफ्रेण्डकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भाडं थकवल्याने मालकाने मल्लिकाला घराबाहेर काढलं!

पॅरिस : बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतला तिच्या राहत्या घरातून बाहेर काढण्यात आल्याचं कळतं. मल्लिका सध्या पॅरिसमध्ये वास्तव्यास आहे.

मल्लिका शेरावत आणि तिचा बॉयफ्रेण्ड कायरिल ऑक्सेफॅन्स ज्या अपार्टमेंटमध्ये राहतात त्याचं भाडं थकल्याने तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. थकलेल्या भाड्याची रक्कम 80 हजार युरो म्हणजेच तब्बल 64 लाखांच्या घरात आहे.

मल्लिका आणि तिच्या बॉयफ्रेण्डकडे पैसे नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक चणचण असल्यानेच घरभाडं थकल्याचं सांगितलं जात आहे.

विरोध म्हणून भाडं दिलं नाही : वकील
मागील वर्षी नोव्हेंबर 2016 मध्ये मल्लिकाच्या अपार्टमेंटबाहेर तिला मारहाण झाली होती. शिवाय तिच्यावर अश्रूधुराचाही वापर करण्यात आला होता. याचा विरोध करण्यासाठी तिने भाडं दिलं नाही, असा दावा तिच्या वकिलांनी केला आहे. तसंच ती सहजरित्या भाडं देऊ शकते, असंही वकिलांनी म्हटलं आहे.

मल्लिका सिक्सटीन्थ अॅरॉनडिसमेंटमध्ये राहते. पॅरिसमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी हे एक आहे. 1965 मध्ये आलेल्या जेम्स बॉण्ड सिनेमापासून आतापर्यंतच्या अनेक हॉलिवूड चित्रपटांचं चित्रीकरण ह्या परिसरात झालं आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Bollywood actress Mallika Sherawat kicked out of her Paris flat
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV